स्वस्त झाला नोकियाचा ‘हा’ स्मार्टफोन


मुंबई : नोकियाने आपल्या नोकिया ६ या स्मार्टफोनच्या ३ जीबी रॅम व्हेरिएंटच्या किंमतीत कपात केली आहे. हा फोन गेल्या वर्षी जून महिन्यात लाँच करण्यात आला होता. १४ हजार ९९९ रुपये एवढी या फोनची लाँचिंग किंमत होती.

पण या फोनच्या किंमतीत आता १५०० रुपयांची कपात करण्यात आल्यामुळे नव्या किंमतीसह हा फोन अमेझॉनवर उपलब्ध आहे. एचएमडी ग्लोबलने २०१८ मध्ये अँड्रॉईड वन नोकिया लाँच केला आहे. त्यानंतर या जुन्या व्हेरिएंटच्या किंमतीत कपात करण्यात आली.

नोकिया ६ स्मार्टफोनमध्ये ७.० नॉगट सिस्टम, ५.५ इंच आकाराची स्क्रीन, ३ जीबी रॅम, ६४ जीबी इंटर्नल स्टोरेज, फिंगरप्रिंट सेन्सर होम बटन, १६ मेगापिक्सेल रिअर कॅमेरा आणि ८ मेगापिक्सेल फ्रंट कॅमेरा आणि साऊंड क्वालिटीसाठी डॉल्बी अॅटमॉस आणि ड्युअल अॅम्प्लिफायर देण्यात आले आहे.

Leave a Comment