सॅमसंगच्या या दोन स्मार्टफोनवर अमेझॉन देत आहे सवलत


नवी दिल्ली : सध्या सॅमसंगच्या दोन स्मार्टफोनवर अमेझॉन सवलत देत असून गॅलक्सी ए८+ वर ४ हजार रुपयांची सूट मिळत असून हा फोन २८ हजार ९९० रुपयांमध्ये खरेदी केला जाऊ शकतो. त्याचबरोबर २ हजार रुपयांची सूट ऑन७ प्राईमवर मिळत आहे. या फोनचे ३२जीबी मॉडेल १० हजार ९९० रुपये आणि ६४ जीबी मॉडेल १२ हजार ९९० रुपयांमध्ये उपलब्ध आहे.

गॅलक्सी ए८+मध्ये ६ इंच आकाराची स्क्रीन देण्यात आली आहे, तर हा फोन ४जीबी आणि ६जीबी रॅम आणि ३२ जीबी आणि ६४ जीबी स्टोरेज व्हेरिएंटमध्ये उपलब्ध आहे. त्याचबरोबर या फोनमध्ये ड्युअल सेल्फी कॅमेरा, १६ मेगापिक्सेल फिक्स्ड फोकस लेंस आणि दुसरा ८ मेगापिक्सेल कॅमरा लेंस आणि १६ मेगापिक्सेल चा f/1.7 अपर्चरचा रिअर कॅमेरा देण्यात आहे.

तसेच गॅलक्सी ऑन ७ प्राईममध्ये ७.१.१ अँड्रॉईड नॉगट सिस्टम, ५.५ इंच आकाराची स्क्रीन, १.६GHz ऑक्टाकोर Exynos ७८७० प्रोसेसर, ३ जीबी रॅम/३२ जीबी स्टोरेज आणि ४ जीबी रॅम/६४ जीबी स्टोरेज व्हेरिएंट, १३ मेगापिक्सेल रिअर आणि फ्रंट कॅमेरा, होम बटण फिंगरप्रिंट सेन्सर देण्यात आला आहे.

Leave a Comment