अमेझॉन देत आहे अॅपलच्या विविध उत्पादनावर बंपर सूट


मुंबई : अमेझॉनने आपल्या अॅपल फेस्ट सेलला सुरुवात केली असून अॅपलचे आयफोन, आयपॅड, मॅकबुक, घड्याळावर या सेलमध्ये एक आठवड्यापर्यंत बंपर सूट देण्यात आली आहे. १२ मार्चपर्यंत हा सेल सुरु असणार आहे.

या सेलमध्ये अॅपलच्या आयफोन X सध्या ८००० रुपयांची सूट देण्यात आली असून ६४ जीबीचा हा स्मार्टफोन ८१००० रुपयांना खरेदी करता येणार आहे. त्याचबरोबर ९३९९९ रुपयांना 256 जीबीचा मॉडेल खरेदी करता येईल. या स्मार्टफोनची बाजारात किंमत १०२,००० रुपये आहे.

या सेलमध्ये आयफोन ८ च्या ६४ जीबी व्हेरिएंटवर ९००० रुपयांची सूट देण्यात आल्यामुळे हा फोन आता ५४९९९ रुपयात खरेदी करता येणार आहे. तर 7000 रुपयांची सूट २५६ जीबीच्या स्मार्टफोनवर देण्यात आली असून तो फोन ६९९९९ रुपयांना खरेदी करता येईल.

आयफोन ८ प्लसवर १० टक्के सूट देण्यात आली असून ६५९९९ रुपयांना याचे ६४ जीबी व्हेरिएंट खरेदी करता येईल. तर ७९९९९ रुपयांना २५६ जीबी मॉडेल खरेदी करता येणार आहे. तसेच या मॉडेलवर १६२५७ रुपयांपर्यंत एक्सचेंज ऑफरही देण्यात आली आहे.

तसेच आयफोन ७च्या ३२ जीबी व्हेरिएंटवर ८००० रुपयांपर्यंत सूट देण्यात आल्यामुळे ४१९९९ रुपयात हा फोन खरेदी करता येणार आहे. त्याचबरोबर आयफोन ७ प्लसवर ३ टक्के सूट देण्यात आली असून हा स्मार्टफोन ६५९९५ रुपयात खरेदी करता येईल. या अॅपल फेस्टमध्ये आयफोन ६एस वर ६००० रुपये सूट देण्यात आल्यामुळे हा फोन ३३९९९ रुपयांना खरेदी करता येईल. आयफोन एसईचे ३२ जीबी व्हेरिएंट १७९९९ रुपयात खरेदी करता येणार आहे. या सेलमध्ये या स्मार्टफोनवर तब्बल ८०००० रुपयांची सूट देण्यात आली आहे.

Leave a Comment