५० महिलांची बायकर्स टीम- मोदींना केले आहे एक्स्कॉर्ट


आज महिला दिन. भारतातील महिला आता अनेक क्षेत्रात चांगली कामगिरी बजावीत आहेत. वेगळ्या क्षेत्रांची निवड करून त्यात आघाडी घेणाऱ्या महिलांची संख्याही कमी नाही. सुरात च्या बाईकक्वीन म्हून ओळख मिळविलेल्या सारिका मेहताच्या बायकर्स टीम मधील महिला बायकर्सची संख्या ५० वर गेली असून या टीमने पंतप्रधान मोदी याच्या सुरत येथील रोड शो मध्ये त्यांना एक्स्कॉर्ट करण्याची कामगिरी पार पाडली आहे.

सारिकाने २०१४ मध्ये बायकिंगला सुरवात केली असून सात पहाड बाईकवरून चढायचा तिचा मानस आहे. त्यातील तीन पहाड चढून झाले आहेत. बायकिंग क्वीन म्हणून ती ओळखली जाते. १५ ऑगस्टला लदाख येथे तिरंगा फडकाविल्यावर तिने पंतप्रधान मोदींची भेट घेतली होती. तेव्हा असाच तिरंगा सुरतमध्ये फडकाव असे मोदी म्हणाले होते. तेव्हा मॅरेथॉनच्या निमित्ताने या टीमने ७५.२५ इची तिरंगा फडकवला होता.

सुरतच्या रोड शो मध्ये मोदींना एक्स्कॉर्ट करून या टीमने नारी शक्तीची ओळख पटविली होती. शनिवार रविवार गरीब घरातील मुलीना शिकविण्यासाठी ही टीम शिबिरे घेते तसेच त्याच्या पालकांना मुलीना शिक्षण देण्याची आवश्यकता समजावून देते.

२०१७ साली द.आफ्रिकेत दरवर्षीप्रमाणे झालेल्या सेफ बाईक राईड मध्ये सारिकाने भारताचे प्रतिनिधित्व केले आहे. या उपक्रमासाठी प्रत्येक देशातून एक महिला बायकर बोलाविली जाते. २०१६ मध्ये सुरत सिंगापोर बाईक प्रवास पूर्ण करताना त्यांनी पूर्ण आशिया पालथा घातला आहे. बेटी बचाव, बेटी पढाओ आणि सशक्त नारी हा संदेश देण्यासाठी हा प्रवास केला गेला होता.

Leave a Comment