४५ वर्षांपासून भंगारात पडलेल्या कारसाठी लागली ४.५ कोटींची बोली


एक अशी कार फ्लोरिडामध्ये समोर आली आहे, जी मागील ४५ वर्षांपासून भंगारात धूळखात पडली होती. लोक या कारला भंगार समजत होते. पण या कारच्या लिलावाची बातमी जेव्हा समोर आली लोकांना तेव्हा धक्काच बसला. या कारवर लिलावात जवळपास ४.५ कोटींची बोली लागली.

एका ऑक्शन हाऊसने नुकतेच ही कार आतापर्यंतचा सर्वाच चांगला शोध असल्याचे म्हटले होते. पोर्शे कंपनीने ही कार तयार केली होती. १९७० मध्ये तयार करण्यात आलेली ही कार एका सेफ्टी ड्राइव्हनंतर कधीही चालवली गेली नाही. ही कार ४५ वर्षांपासून भंगारात पडून होती. सेफ्टी ड्राइव्हमध्येच 1500 GS Carrera Coupe नावाची ही कार फेल झाली होती. या कारचे उत्पादन ब्रेकिंग सिस्टीम फेल झाल्याने करण्यात आले नाही.

टेस्ट ड्राइव्हमध्ये ही कार फेल ठरली असली तरी, हिचा पोर्शे कंपनीला खूप फायदा झाला. मीडिया रिपोर्ट्सनुसार या कारने आज जगभरातील पोर्शेच्या स्पोर्ट्स कार टॉपवर पोहोचण्यासाठी खूप मदत केली. या कारच्या डिझाइनमुळेच रेसिंग कारचा नवा काळ पाहायला मिळाला. कार प्रेमिंसाठी हे एक क्लासिक आर्ट असल्यामुळेच लिलावासाठी एवढी किंमत सांगितली जात आहे.

Leave a Comment