हा आहे भारतातील सर्वात मोठा रेड लाइट एरिया


वेश्‍या व्‍यवसाय प्राचीन काळापासून समाजात प्रचलित असून या व्‍यवसायाला काही देशात कायदेशीर मान्‍यताही आहे. पण देहव्रिकी हा भारतात गुन्‍हा आहे. असे असताना राजरोसपणे भारतातील सर्वत्र देहविक्री व्‍यवसाय सुरू आहे. एवढेच नाही तर आशिया खंडातील सर्वात मोठ्या रेड लाइट एरियापैकी एक एरिया पश्चिम बंगालमधील सोनागाच्छी आहे. विशेष म्‍हणजे या ठिकाणी 14 हजारांपेक्षा अधिक महिला या देहविक्री करतात.

१८ वर्षांखालील १२ हजार मुली येथील कुटुंखाण्यात काम करतात. येथील काही निवडक फोटो फोटोग्राफर सुजोत्रा घोषने क्लिक केले आहेत. कोलकातामधील या वेश्यालयावर एक चित्रपटदेखील बनवण्यात आला आहे. ऑस्करमध्ये Born Into Brothels नावाच्या या चित्रपटाला सन्मानित करण्यात आले होते.

दिवसाकाठी देहविक्रीतून १४२ रुपये सोनागाछीमध्ये राहणाऱ्या महिला कमवतात. यांच्या चेहऱ्यावर हास्य दिसत असले, तरी त्या मागे खूप मोठे दुख: असते. या वेश्यावृत्तीलाच त्यांनी आपले जीवन मानले आहे. इतर सामान्य लोकांना या परिसरात प्रवेश नाही. त्याचबरोबर पत्रकार किंवा फोटोग्राफर्सनादेखील आत सहजासहजी प्रवेश मिळत नाही. या महिलांसाठी अनेक सामाजिक संस्था काम करतात. त्‍यांना एचआव्‍ही एड्स आणि इतर आजारांपासून मार्गदर्शन केले जाते.