मोदींनंतर सोशल मीडियावर अमित शहांचा दबदबा


नवी दिल्ली – सोशल मीडियावर पंतप्रधान नरेंद्र मोदी खूप सक्रीय असतात. सोशल मीडियावर मोदी हे अजूनही सर्वाधिक लोकप्रिय भारतीय नेते असून आता मोदींच्या मागोमाग भाजपच्याच नेत्याची दुसऱ्या क्रमांकावर वर्णी लागली आहे. फेसबुक आणि ट्विटरवर भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांना सर्वाधिक फॉलो केले जाणारे दुसरे नेते आहेत. अमित शहा यांचे दोन कोटींहून अधिक फॉलोअर्स सोशल मीडियावर असून फक्त ट्विटरवरच मोदींचे पाच कोटींहून अधिक फॉलोअर्स आहेत. ट्विटर, इन्स्टाग्राम आणि फेसबुक या तिन्ही सोशल साईटवर शहा यांचे फॉलोअर आहेत.

२०१३ मध्ये शहा यांनी ट्विटरवर अकाऊंट सुरू केले होते आणि त्यांनी दोनच दिवसांपूर्वी एक कोटी फॉलोअर्सचा टप्पा ओलांडला. त्यांचे १.१ कोटी फॉलोअर्स फेसबुकवर आहेत. तर इन्स्टाग्रामवर ६.७७ लाख लोक त्यांना फॉलो करतात. भाजपतील एका सूत्राने दिलेल्या माहितीनुसार शहा या माध्यमाचा उपयोग पक्ष कार्यकर्त्यांच्या संपर्कात राहणे आणि लोकांच्या समस्या सोडवण्यासाठी करतात.

Leave a Comment