महिंद्राची ऑफरोड रॉक्सर आंतरराष्ट्रीय बाजारात दाखल


महिंद्राने त्यांची नवी ऑफरोड एसयूव्ही आंतरराष्ट्रीय बाजारात सादर केली आहे. रॉक्सर या नावाने बाजारात दाखल झालेली या गाडीला दरवाजे आणि छत नाही. पॉवरसपोर्ट सेग्मेंटमध्ये असलेल्या या कारची बेसिक किंमत १० हजार डॉलर म्हणजे १० लाख रुपये आहे. अतिशय मजबूत आणि दणकट बॉडी असलेल्या या कारचा डॅशबोर्ड स्टीलपासून बनविला गेला आहे.

या गाडीला ग्रॅब हँडल सह सध्या सीट, डॅशबोर्डच्या मध्ये एक सिम्पल गेज क्लस्टर, सेन्ट्रल कन्सोल मध्ये कप होल्डर आहेत. अमेरिकेत हे फिचर कारमध्ये लोकप्रिय फिचर आहे. ऑफरोड कारला २.५ लिटर, ४ सिलिंडर टर्बो डीझेल इंजिन, लेफ्ट हँड ड्राईव्ह, ५ स्पीड मॅन्यूअल गिअर बॉक्स अशी अन्य फिचर आहेत. ही गाडी अमेरिकेत भारतातून आयात केली जाणार आहे. तिला कस्टमाईज करण्याची सुविधाही दिली गेली आहे.

Leave a Comment