दुबईत बनतेय फ्लोटिंग मार्केट


पर्यटकांसाठी अनेक आकर्षक स्थळांची भरमार असलेल्या दुबईत आता नवे आकर्षण निर्माण केले जात आहे. बीयू लँड कंपनीचे संस्थापक शेक माहा हशर यांनी दुबई येथे पहिलेवाहिले फ्लोटिंग मार्केट म्हणजे तरंगता बाजार मे २०१८ पर्यंत सुरु होत असल्याचे सांगितले आहे. यात १७ अलिशान नौकांमध्ये दुकाने. रेस्टोरंट असतील आणि हा बाजार पूर्णपणे वातानुकुलीत असेल असे समजते.

दुबईत बहुतांश खरेदी मॉलमध्ये जाऊन केली जाते. या प्रकाराला जे पर्यटक अथवा स्थानिक कंटाळले आहेट त्यांना फ्लोटिंग मार्केट हा चांगला अनुभव ठरेल असा विश्वास व्यक्त केला जात आहे. बँकॉक येथील फ्लोटिंग मार्केटवरुन या बाजाराची प्रेरणा घेतली गेली आहे. दुबई क्रीकवर २ किमीचा परिसर अल सिफ नावाने बनविला गेला आहे तेथेच हे मार्केट सुरु होत आहे. या मार्केट मध्ये स्थानिक तसेच इंटरनॅशनल ब्रँड उपलब्ध असतील आणि पहिल्याच वर्षात येथे किमान ९० लाख लोक फिरणे आणि शॉपिंग साठी येतील असा अंदाज आहे.

Leave a Comment