केवळ त्वचेसाठीच नाही तर सुंदर केसांसाठीही हळद गुणकारी


विवाहप्रसंगी वधू आणि वर सुंदर दिसावेत यासाठी त्यांना हळद लावण्याची पद्धत आहे. पण हळदीचा उपयोग केवळ त्वचेच्या सौंदर्यासाठी नाही, तर सुंदर केसांसाठी देखील होतो. हळदीच्या अनेक औषधी गुणांनी केसांचे आरोग्य चांगले राहून केस सुंदर दिसण्यास मदत होते. हळदीमध्ये असलेली ‘कुर्कुमीनॉइड्स’, म्हणजेच कुर्कुमीन आणि तत्सम इतर तत्वे केसांच्या आरोग्यासाठी फायदेशीर आहेत. तसेच यामध्ये असलेली ट्युमेरॉन, अटलांटोन, इत्यादी तेल स्काल्प चे आरोग्य चांगले राखून डोक्यातील कोंडा कमी करण्यास सहायक आहेत.

हळदीच्या वापरामुळे स्काल्पमधील रक्ताभिसरण सुरली होण्यास मदत होते. केसांना हळद लावण्यासाठी ऑलिव्ह ऑईलमध्ये हळद मिसळून केसांना लावल्यास, आणि या तेलाने स्काल्पची मालिश केल्याने फायदा होतो. यासःती समप्रमाणात हळद आणि ऑलीव्ह ऑईल वापरून, स्नानाच्या अर्धा तास आधी हे हळदमिश्रित तेल केसांना लावावे. त्यानंतर अर्ध्या तासाने नेहमीप्रमाणे शँपूने केस धुवावेत.

केसांमधील tgf beta १ मुळे केस गळती उद्भवत असते. पण कुर्कुमीन मध्ये tgf beta १ ची सक्रियता नियंत्रित करण्याची क्षमता असल्याने हळदीच्या वापराने केस गळती कमी होण्यास मदत होते. यासाठी हळद, दुध आणि मध असे एकत्र करून केसांना लावावे. केस गळती थांबविण्यासाठी ही एक नॅचरल ट्रीटमेंट आहे. हे मिश्रण केसांना सावकाश चोळून लावावे. त्यानंतर थोड्या वेळाने केस धुवावेत.

अनेकदा डर्मिटायटीस किंवा एक्झिमा सारख्या त्वचारोगांमुळे डोक्यामध्ये सतत खाज सुटणे, स्काल्प सतत लालसर दिसणे, केस गळती आशय तक्रारी उद्भवितात. हळदीमध्ये अँटी फंगल, अँटी बॅक्टेरियल आणि अँटी इन्फ्लेमेटरी प्रॉपर्टीज असल्याने त्वाचारोगांमुळे स्काल्पला सतत खाज, लालसरपणा, अश्या तक्रारी दूर होण्यास मदत मिळते. या साठी हळद अर्धा कप दह्यामध्ये मिसळून हे मिश्रण स्काल्पवर लावावे. हे मिश्रण अर्धा तास राहू देऊन पूर्ण वाळल्यानंतर केस धुवून टाकावेत.

केसांची चमक वाढविण्यासाठी आणि केस मुलायम होण्यासाठी हळद अंड्याच्या बलकामध्ये मिसळून केसांना लावावे. ह्या हेअर मास्कमुळे केस चमकदार होतात, आणि त्याचे टेक्स्चर देखील सुधारते. जर केसांवर थोडीशी लालसर छटा तुम्हाला आवडत असेल, तर केसांना मेहंदी लावताना मेहेंदी, दही आणि त्यामध्ये थोडी हळद घालून हे मिश्रण केसांना लावावे.

Disclaimer: आरोग्य विषयक लेखात दिली गेलेली माहिती प्राथमिक स्वरुपाची आहे. हि माहिती वैद्यकीय सल्ल्याचा पर्याय होऊ शकत नाही  या माहितीचा उपयोग करण्यापूर्वी आपण डॉक्टर अथवा वैद्यकीय तज्ञाकडून खात्री करून घ्यावी. या माहितीची जवाबदारी माझा पेपर घेत नाही

Leave a Comment