
नवी दिल्ली – व्हॉट्सअॅपच्या माध्यमातून एकदा पाठवलेला मेसेज यापूर्वी डिलीट करता येत नव्हता. पण तो मेसेज अलीकडे काढून टाकता येऊ लागला होता, पण त्यासाठी सात मिनिटांचा कालावधी देण्यात आला होता. यापुढे ६८ मिनिटे म्हणजे ४०९६ सेकंदात तुम्ही व्हॉट्सअॅपवरचा मेसेज डिलिट फॉर एव्हरीवनच्या मदतीने काढून टाकू शकता.
आता तासाभरातही डिलीट करता येणार ‘तो’ व्हॉट्सअॅप मेसेज
ही सुविधा व्हॉट्सअॅपच्या बिटा आवृत्ती वापरणाऱ्यांना उपलब्ध असून बिटा २.१८.६९ ही ती आवृत्ती आहे. याशिवाय आता स्टिकर्स पाठवता येणार आहे. डिलिट फॉर एव्हरीवन सेवा आता आयओएसवर दिली जाणार आहे, जी अँड्राइड बिटा आवृत्तीत आहे. डिलिट फॉर एव्हरीवन ही सुविधा फार महत्त्वाची असल्यामुळे चुकीने पाठवलेले संदेश रद्द करता येतात. ही सुविधा स्नॅपचॅट व फेसबुक मेसेंजरवर आधीच होती.
