कर्जबुडव्यांमध्ये महाराष्ट्र पहिला


मुंबई : बँकांचे कर्ज क्षमता असूनही थकवणाऱ्या बुडव्यांच्या संख्येत महाराष्ट्र देशात नंबर एक ठरला असून ही माहिती सीबीलने जाहीर केलेल्या आकडेवारीत स्पष्ट झाले आहे. २५ लाखांहून अधिकचे कर्ज बँकांकडून घेऊन ते थकवणाऱ्या आणि भरण्याची शक्ती असूनही स्वतःहून कारणे पुढे करून बुडवण्याचा प्रयत्न करणाऱ्या नादारांची संख्या महाराष्ट्रात सर्वाधिक आहे.

दुसरीकडे सामान्य कर्जदारांचे बँकांच्याबाबत अनुभव वेगळे आहेत. त्यांच्यामते बँका सामान्यांना कर्ज देतात आणि पूर्णतः बांधून घेतात. तुलनेत बड्या लोकांना कर्ज बुडावण्याचा मार्ग आधीच दाखवलेला असतो. सप्टेंबर २०१७ पर्यंत देशातील सरकारी बँकांमधील फक्त ७५६४ कर्जदारांनी ९३ हजार ३५७ कोटी रुपये थकवले आहेत. ही आकडेवारीच अनेक गोष्टी स्पष्ट करते.

Leave a Comment