पीएनबी घोटाळ्यातील घोटाळेबहाद्दरांवर मॉरिशस करणार कठोर कारवाई


नवी दिल्ली – भारतात सर्वाधिक परकीय गुंतवणूक करणाऱ्या मॉरिशसने सार्वजनिक क्षेत्रातील दुसऱ्या क्रमांकाची बँक असलेल्या पंजाब नॅशनल बँकेतील घोटाळ्यानंतर कठोर कारवाई करण्याचे निर्देश दिले आहेत. बँकेच्या देशांतर्गत शाखांबरोबरच परदेशातील शाखांचा कथित घोटाळ्यात सहभाग समोर आला आहे.

माध्यमांत ‘पीएनबी’ घोटाळ्याबाबत विविध वृत्ते प्रसिध्द करण्यात आली. मॉरिशसच्या वित्त सेवा आयोगाने या वृत्तांच्या आधारावर प्रसिध्दीपत्रक जारी केले. बँक ऑफ मॉरिशससोबत घोटाळ्याच्या तक्रारीबाबत चर्चा सुरु असल्याचे प्रसिध्दी पत्रकात नमूद करण्यात आले आहे. पीएनबी घोटाळ्यात बेकायदेशीर पध्दतीने हमीपत्रे (लेटर ऑफ अंडरटेकिंग) देण्यात आली होती. त्याच्या आधारे मोदी आणि चोक्सी यांनी विविध बँकांच्या परदेशी शाखेतून कर्ज घेतले होते.

मॉरिशसचा भारतातील थेट परकीय गुंतवणुकीत वाटा सर्वाधिक असून मॉरिशसमध्ये हवालामार्फत पैशांची गुंतवणूक केल्याचे प्रकार यापूर्वी घडले असल्यामुळे पीएनबी घोटाळ्यात मनी लॉड्रींगचा संशय वर्तविला जात आहे.

Leave a Comment