फेसबुकचे नवे फीचर व्हॉइस क्‍लिप


मुंबई : फेसबुकमार्फत सध्या भारतात एड व्हॉइस क्‍लिप या नवीन फीचरची चाचपणी सुरू असून हे फीचर स्टेट्‌स अपडेटच्या मॅसेज कम्पोझिंग मेन्यूमध्ये दिसणार आहे. छोटी ऑडिओ क्‍लिप रेकॉर्ड करण्याची सुविधा फेसबुक वापरकर्त्यांना यामुळे मिळेल.

महत्त्वाचे म्हणजे हे फीचर भारतीय वापरकर्त्यांनाच वापरण्यासाठी मिळाले आहे. या व्हॉइस क्‍लिपचा वापर टाइप करण्याला पर्याय म्हणून होईल. जगभरात टायपिंगमध्ये येणाऱ्या अडचणी लक्षाच घेऊन फेसबुकने स्टेट्‌स अपडेटसाठी या फीचरची निर्मिती केली आहे.

यूजर्सना आपल्या स्थानिक भाषेतील की बोर्ड नसल्यामुळेच स्टेट्‌स अपडेट करण्यात अडचणी येतात. वापरकर्त्यांना या फीचरच्या माध्यमातून व्यक्त होण्यासाठी एक नवे माध्यम मिळेल, असे फेसबुकचे म्हणणे आहे. या फीचरअंतर्गत अलोहा आणि फिओना हे मॉडेल विकसित करण्यात येत आहे. त्यामध्ये व्हॉइस कमांडवर आधारित वापरकर्त्याची ओळख असेल. त्यासोबतच फेसबुकने चेहऱ्याद्वारे ओळखीवर आधारित लॉग इनचे मॉडेल विकसित करण्यासाठी पुढाकार घेतला आहे.

Leave a Comment