रेनो डस्टरच्या किमतीत भरघोस कपात


नवी दिल्ली : आपल्या डस्टर गाडीच्या किमतीत प्रसिद्ध कार निर्माता कंपनी असलेल्या रेनोने मोठी कपात केली आहे. पेट्रोल व्हेरिएंटच्या किमतीत कंपनीने ३६ हजार रुपयांपासून ५६ हजार रुपयांपर्यंत कपात केली आहे. तर, डिझेल व्हेरिएंटच्या किमतीत ५० हजार रुपयांपासून १ लाख रुपयांपर्यंत कपात केली आहे.

याबाबत कंपनीने दिलेल्या माहितीनुसार, नव्या स्तरावर रेनो डस्टर गाडीचे उत्पादन सुरु करण्यात आले आहे. गाडीच्या किमतीत करण्यात आलेल्या कपातीचा थेट फायदा ग्राहकांना मिळणार आहे. रेनो डस्टरच्या पेट्रोल रेंजची सुरुवाती किंमत ७.९५ लाख रुपये (एक्स शोरुम) ठेवण्यात आली आहे. तर, डिझेल व्हेरिएंटची सुरुवाती किंमत ८.९५ लाख रुपये (एक्स शोरुम) ठेवण्यात आली आहे.

रेनो डस्टरच्या RXZ ११० PS AWD या गाडीच्या किंमतीत सर्वाधिक कपात करण्यात आली आहे. एक लाख रुपयांनी कपात या कारच्या किमतीत केली आहे. रेनो कारच्या विक्रीत घट झाल्याचे पहायला मिळत आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार, डस्टरच्या विक्रीत १८ टक्क्यांनी घट झाल्याचे समोर आल्यामुळेच कंपनीने किमतीत घट करण्याचा निर्णय घेतला असल्याची चर्चा आहे.

Leave a Comment