जिओने जिंकला यावर्षीचा प्रतिष्ठित ग्लोबल मोबाईल अॅवॉर्ड


मुंबई : मोबाईल वर्ल्ड काँग्रेसमध्ये रिलायन्स जिओ इन्फोकॉम लिमिटेडने आपला टेक्नोलॉजी पार्टनर सिस्कोसह प्रतिष्ठित ग्लोबल मोबाईल अॅवॉर्ड २०१८ जिंकला आहे. बेस्ट मोबाईल ऑपरेटर सर्व्हिस फॉर कन्झ्युमरसाठी हा अॅवॉर्ड देण्यात आलाय. मोबाईल विश्वातील हा अॅवॉर्ड ऑस्कर अॅवॉर्ड मानला जातो. याशिवाय कंपनीच्या जिओ टीव्ही अॅपने बेस्ट मोबाईल व्हिडीओ कंटेट श्रेणीमधील अॅवॉर्ड मिळवला आहे.

रिलायन्स जिओने भारतात ४ जी नेटवर्क आणि स्वस्तात डेटा आणि डिजीटल सेवा देण्यासोबतच इनोव्हेटिव टेक्नोलॉजी आणि नवा व्यावसायिक दृष्टिकोन देत भारताला डिजीटल रुपाने सक्षम राष्ट्र बनवण्यात महत्त्वाची भूमिका बजावली आहे. या प्रतिष्ठित पुरस्कारासह जिओने जागतिक स्तरावर नवी ओळख मिळावली आहे.

टेलिकॉम इंडस्ट्रीमध्ये जिओने पाऊल ठेवताच डेटा वापराचे पॅटर्नच बदलले आहे. आता जगातील सर्वात मोठा मोबाईल वापराचा भारत देश बनला आहे. कोट्यावधी भारतीयांनी जिओच्या माध्यमातून डिजीटल लाईफस्टाईल आपलीशी केली आहे. जिओ लाँच केल्यानंतर १६ महिन्यांच्या आत १६ कोटीहून अधिक ग्राहक या नेटवर्कशी जोडले गेले.

Leave a Comment