जिओला टक्कर देणार एअरटेलचा नवा प्लॅन !


मुंबई : एअरटेल कंपनीने रिलायन्स जिओला टक्कर देण्यासाठी त्यांचा नवा प्लॅन आणला असून ९९५ रूपयांचा नवा प्लॅन एअरटेलने आणला आहे. एअरटेलच्या प्रीपेड युजर्ससाठी ९९५ रूपयांचा प्लॅन उपलब्ध आहे. या प्लॅनमध्ये अनलिमिटेड लोकल आणि एसटीडी कॉलिंग सोबत रोमिंग कॉलदेखील मोफत मिळणार आहेत. एअरटेलच्या या स्पेशल रिचार्ज पॅकमध्ये प्रतिदिन १०० मेसेज मिळणार आहेत. १८० दिवसांसाठी ग्राहकांना ६ जीबी डाटा मोफत मिळणार आहे. मात्र ग्राहक एका महिन्यात १ जीबीहून अधिक डाटा वापरू शकणार नाही. एअरटेल इंडियाच्या या प्लॅनला देशभरात सर्वत्र उपलब्ध करण्यात आले आहे.

Leave a Comment