भारतात हार्ले डेव्हिडसनने लॉन्च केल्या दोन नव्या दमदार बाईक्स


नवी दिल्ली : आपल्या दोन नव्या बाईक्स अमेरिकन कंपनी हार्ले डेव्हिडसन बाईक कंपनीने लॉन्च केल्या आहेत. या बाईक्सची नावे सॉफ्टेल डीलक्स आणि लो रायडर अशी असून याआधी कंपनीने भारतात फॅट बॉय या बाईकचे अ‍ॅनिव्हर्सरी एडीशन लॉन्च केले होते. १९.७९ लाख रूपये एवढी या बाईकची एक्स-शोरूम किंमत ठेवली आहे. २०१८ हार्ले डेव्हिडसन सॉफ्टटेल डिलक्स भारतात सॉफ्टटेल रेंजची पाचवी बाईक आहे.

भारतात नव्या हार्ले डेव्हिडसन सॉफ्टटेल डिलक्स बाईकला लाईनअपमध्ये फॅट बॉब आणि फॅट बॉय यांच्या जागी रिप्लेस केले जाणार आहे. क्रूजर बाईक आवडणा-या तरूणांवर लक्ष केंद्रीत करून हार्ले डेव्हिडसनने या बाईक्सची निर्मिती केली आहे. सॉफ्टेल डीलक्स बाईकमध्ये कंपनीने पूल बॅक हॅंडलबार, क्रोम व्हिल्स, एलईडी हेडलाईट, डे-टाईम रनिंग लाईट, कीलेस इग्निशन, एबीएस इत्यादी फीचर्स दिले आहेत.

१९७० च्या स्टाईलने हार्लेच्या लो रायडर बाईकला डिझाईन केले गेले आहे. पण यात फ्रेम लूक नवा देण्यात आला आहे. इंजिन ते सायलेन्सरपर्यंत क्रोम असून १७४६ सीसीचे इंजिन लो रायडरमध्ये दिले गेले आहे. जे १४९ न्यूटन मीटर टॉर्क जनरेट करते. तेच दुस-या हार्ले डेव्हिडसन सॉफ्टेल डीलक्समध्येही इंजिन देण्यात आले आहे. पण त्याची स्टाईल वेगळी आहे. या नव्या दोन्ही बाईकची किंमती क्रमश: १७,९९ लाख रूपये आणि १२.९९ लाख रूपये ठेवण्यात आली आहे. ही एक्स-शोरूम किंमत आहे. हे दोन्ही क्रूजर भारतात पहिल्यांदाच लॉन्च करण्यात आली आहे.

Leave a Comment