सोन्याची ३२ हजारी पार


मुंबई : गेल्या चार दिवसांपासून सोन्याच्या दरात सलग वाढ होत असून सोन्याचे दर आज (बुधवार) तब्बल ३२००० रुपयांच्याही पुढे पोहचले आहेत. आज मुंबईत सोन्याचा दर (२४ कॅरेट) दहा ग्रामसाठी ३२१७१ रुपये एवढा आहे. सोन्याच्या दरात वाढ परदेशी बाजारात डॉलर कमजोर झाल्याचे तज्ज्ञांचे म्हणणे आहे. तसेच सोन्याची मागणी वाढल्याने दर वाढले असल्याचे स्थानिक सराफांकडूनही सांगण्यात येत आहे. सोन्याच्या दरात गेले अनेक दिवस वाढ होत असल्याने मध्यमवर्गींयांमध्ये मात्र याबाबत बरीच नाराजी असल्यामुळे सोने खरेदीस मध्यमवर्गींयांचा म्हणावा तसा प्रतिसाद मिळत नसल्याचे दिसून येत आहे.

Leave a Comment