एअरटेलची गुगलसोबत हातमिळवणी; मार्चमध्ये करणार लॉन्च स्वस्त स्मार्टफोन


नवी दिल्ली : रिलायन्स जिओच्या फीचर फोनला मिळालेल्या प्रतिसादानंतर आता एअरटेलही ग्राहकांसाठी एक फीचर फोन घेऊन येणार आहे.

यासाठी एअरटेलने सर्वात मोठे सर्च इंजिन असलेल्या गूगल सोबत करार केला असून दोन कंपन्या या करारानुसार स्वस्तात स्मार्टफोन बाजारात आणणार आहे. याबाबत माहिती देताना भारती एअरटेलने सांगितले की, स्वस्त अ‍ॅन्ड्रॉईड ओरियो स्मार्टफोन भारतीय बाजारात आणण्यासाठी त्यांनी गूगलसोबत हात मिळवला आहे. गेल्या डिसेंबरमध्ये १ जीबी आणि कमी रॅम असलेला स्मार्टफोनसाठी प्रमुख आयटी कंपनी गुगलने अ‍ॅन्ड्रॉईड ओरियो(गो एडिशन)सादर केला, जे ऑपरेटींग सिस्टम आहे. या करारानुसार मार्चपासून त्यांचा फोन ‘मेरा पहला स्मार्टफोन’ कार्यक्रमांतर्गत विकला जाणार आहे.

अ‍ॅन्ड्रॉईड ओरियो(गो एडिशन) वर आधारित ४जी स्मार्टफोन विकण्याची घोषणा लावा आणि मायक्रोमॅक्स कंपनीने आधीच केली आहे. या स्मार्टफोनमध्ये मायएअरटेल, एअरटेल टिव्ही आणि विंक म्युझिक सारखे अ‍ॅप असतील. एअरटेलने या कार्यक्रमासाठी अनेक हॅंडसेट कंपन्यांसोबत हातमिळवणी केली आहे.

Leave a Comment