लसूण आणि रेड वाईन यांच्या कॉम्बीनेशनने फॅट लॉस होण्यास फायदा


आपल्या खाण्यापिण्याच्या शौकामुळे किंवा अन्य काही कारणामुळे वजन झपाट्याने वाढते खरे, पण वाढलेले वजन कमी करणे हे मात्र मोठे अवघड काम असते. मग वजन घटविण्यासाठी निरनिराळ्या उपायांचा अवलंब केला जातो. निरनिराळी डायट्स, व्यायामाचे शेड्युल, खाण्यापिण्याचे ठराविक वेळापत्रक यांचे काटेकोर पालन सुरु होते. वजन कमी होते ही, पण पोट, मांड्या इथे साठलेले फॅट मात्र फारसे घटत नाही. पण एका उपायाने मात्र फॅट लॉस होण्याची शक्यता आहे.

जर तुम्ही तुमच्या आहारामध्ये जराशी रेड वाईन आणि लसूण यांचे मिश्रण समाविष्ट केले तर हे मिश्रण फॅट लॉस साठी सहाय्यक ठरू शकते. अश्या मिश्रणाची कल्पना जरी विचित्र वाटत असली, तरी या मिश्रणाच्या सेवनाने शरीरातील चरबीचे प्रमाण कमी होत असल्याचे म्हटले जाते. रेड वाईन मध्ये असलेल्या रेसवेराटोल नामक पदार्थामुळे शरीरातील चरबी घटण्यास मदत होते, व लसूणामध्ये अँटी ऑक्सिडंट्स मोठ्या प्रमाणावर असल्याने ते देखील आरोग्याच्या दृष्टीने अतिशय फायद्याचे आहे.

रेड वाईन आणि लसूण ह्या मिश्रणाचे सेवन केल्याने अनेक लहान सहान आजार देखील बरे होण्यास मदत होते. ह्या मिश्रणाच्या सेवनाने शरीरातील घातक पदार्थ बाहेर टाकले जाण्यास मदत होते. तसेच शरीराच्या चयापचयामध्ये देखील वाढ होते. हे मिश्रण बनविण्यासाठी लसणीच्या बारा पाकळ्या साले काढून अर्धा लिटर रेड वाईनमध्ये घालाव्यात. जर लसणीच्या सबंध पाकळ्या घालायच्या नसतील, तर लसणीच्या पाकळ्यांचे लहान लहान तुकडे करून वाईनमध्ये घालावेत. हे मिश्रण एका काचेच्या बरणीमध्ये भरून ठेवावे. ही बरणी दोन आठवडे कडक उन्हामध्ये ठेवावी. दोन आठवडे हे मिश्रण उन्हामध्ये ठेवल्यानंतर चांगले ढवळून घेऊन गाळावे. त्यानंतर दररोज दोन ते तीन चमचे या प्रमाणे या मिश्रणाचे सेवन करावे. ज्या व्यक्तींना लसणाची अॅलर्जी असेल, त्यांनी मात्र या मिश्रणाचे सेवन करू नये.

Disclaimer: आरोग्य विषयक लेखात दिली गेलेली माहिती प्राथमिक स्वरुपाची आहे. हि माहिती वैद्यकीय सल्ल्याचा पर्याय होऊ शकत नाही  या माहितीचा उपयोग करण्यापूर्वी आपण डॉक्टर अथवा वैद्यकीय तज्ञाकडून खात्री करून घ्यावी. या माहितीची जवाबदारी माझा पेपर घेत नाही

Leave a Comment