लोकांची पर्वा न करता आंनदाने पोल डान्स करतात बापलेक


समाज आपल्याविषयी काय म्हणेल याची जराही पर्वा एक २६ वर्षीय मुलगी तिच्या ५२ वर्षीय वडिलांना नाही आणि ते दोघे आनंदाने पोल्स डान्स करतात. विल्टशायरमध्ये राहणारे डेव आणि त्यांची मुलगी बेजेल रोबर्ट्स पूर्वी वेग-वेगळे डान्स करत होते. पण त्यांना जेव्हा एकमेकांच्या छंदाविषयी माहित झाल्यानंतर दोघे सोबत पोल डान्स करू लागले.

त्यांच्या सांगण्यानंतर, दोघांचे नाते डान्स करताना पूर्वीपेक्षा घट्ट झाले असून त्यांच्यावर लोक प्रश्न उपस्थित करत आहेत. त्यांच्याबाबत अनेकांचे म्हणणे आहे कि, वडिलांना मुलीसोबत असे पोल डान्स करणे शोभा देत नाही. त्यांनी विल्टशायरमध्ये आपल्या घरी दोन पोल तयार केले असून त्यांना एकत्र पोल डान्स करणारी मुलगी आणि वडिलांची पहिली जोडी इंग्लंडच्या मिरर न्यूज वेबसाइटने म्हटले आहे. या दोघांनी इंग्लंडमध्ये झालेल्या एका नॅशनल चॅम्पिअनशिपमध्ये पहिले बक्षिस जिंकले. आता हे बापलेक आणखी एक स्पर्धेची तयारी करत आहेत.

५ मुलांचे वडील असलेले डेव म्हणतात, मला याची जाणीव आहे, की जे मी करत आहे सामान्य नाही. पण मला असे वाटते, की आम्ही एक चांगली गोष्ट करत आहोत. डेव यांची मुलगी म्हणाली, की एक फन एक्सरसाइज आहे आणि त्यामध्ये काहीही चुकीचे नाही.

Leave a Comment