या लायब्ररीत मिळणार पुस्तकांमध्ये झोपण्याचा अनुभव


लायब्ररीमध्ये घरच्याप्रमाणे झोपून पुस्तक वाचता आले तर? असे ऐकायला काहीसे अजब वाटत असेल पण ही गोष्ट सत्यात अवतरली आहे. त्याचबरोबर येथे वाचता वाचता झोप आली तर याठिकाणी तुम्हाला झोपताही येणार आहे. ही लायब्ररी यूकेमधील फ्लिंटशायर येथे असून तिचे नाव आहे ग्लॅडस्टोन्स लायब्ररी. १ लाख ५० हजारांहून अधिक पुस्तके याठिकाणी उपलब्ध आहेत.

साधारणपणे लायब्ररी ही दिवसा सुरु असते. पण ही लायब्ररी रात्री देखील सुरु असते. एखाद्या पुस्तकप्रेमीला त्यामुळे रात्री वाचन करुन येथे झोपायचे असल्यास तो तसे अगदी सहजपणे करु शकतो. याठिकाणी बेडबरोबरच टेबल-खुर्च्या, सोफा अशी बसण्यासाठीही अतिशय चांगली सुविधा देण्यात आली आहे. असंख्य पुस्तकांमध्ये झोपण्याचा एक आगळावेगळा अनुभवही या अनोख्या लायब्ररीमुळे तुम्हाला घेता येऊ शकतो. जागतिक स्तरावरील अनेक मोठ्या लेखकांनी याठिकाणाला भेट दिली आहे.

Leave a Comment