अनलिमिटडेड इंटरनेटसह मेसेजही फ्री देणारे सिम लॉन्च


नवी दिल्ली : एक धमाकेदार सिमकार्ड मोबाईल सिमकार्ड देणारी कंपनी चॅट सिमने लॉन्च केले असून अनलिमिटेड इंटरनेट आणि मेसेजही हे कार्ड तुम्हाला फ्री देणार आहे. चक्क १६५ देशांमध्ये ही सुविधा उपलब्ध असणार आहे.

याबाबत कंपनीने दिलेल्या माहितीनुसार, ग्राहकास या सिमकार्डच्या माध्यमातून अनलिमिटेड इंटरनेट सर्फिंग आणि मेसेजिंग करता येणार आहे. वेगळे असे काणत्याही प्रकारचे शुल्क या सिमसाठी द्यावे लागणर नाही. चॅट सिमच्या वार्षिक प्लानअंतर्गत ही सुविधा तब्बल १६५ देशांमध्ये उपलब्ध असणार आहे. २६ फेब्रुवारी ते एक मार्च अशा कालावधीत बार्सिलोनामध्ये चालणाऱ्या ‘मोबाईल वर्ल्ड काँग्रेस २०१८’मध्ये हे सिम सादर केले जाईल.

दरम्यान, कंपनीने यापूर्वीही एक चॅट सिम लॉन्च केले होते. या सिमच्या माध्यमातूनही तेव्हा ग्राहकांना फोटो, व्हिडिओ पाहता आणि पाठवता तसेच, व्हाईस कॉलिंगही करता येत होती. पण, ग्राहकांना त्यासाठी काही मल्टीमीडिया क्रेडिट्स खरेदी करावी लागत असत. आता नव्या सिमबाबत कंपनीचा दावा आहे की, ग्राहकांना इंटरनेट सर्फिंग आणि बाकी मोबाईल अप्लिकेशन्सचा वापर करण्यासाठी इतर कोणत्याही प्रकारचे क्रेडिट घ्यावे लागणार नाही.

Leave a Comment