रोल्स रॉयसची नवी कोरी ‘फॅंटम’ लॉन्च


मुंबई : रोल्स रॉयस हे चारचाकी गाड्यांमध्ये कार विश्वातील महत्त्वाचे नाव असून नुकतीच आपली नवी कोरी कार या कंपनीने लॉन्च केली. या कारचे नाव फॅंटम असे असून, भारतातील या कारची किंमत ही ९.५ कोटी ते ११.३५ कोटी रूपयांपर्यंत आहे. गाडीच्या फिचर्सनुसार ही किंमत बदलताना दिसते.

चारी कोपऱ्यांना एअर सस्पेंशनयुक्त अशी ही नवी कोरी फॅंटम आहे. यात १३० किलोचे साऊंड इन्सूलेशन, डबल लॅमिनेटेड ग्लास आणि ड्यूअल स्किल अलॉयज आहे. या कारबाबत माहिती देताना कंपनीने म्हटले आहे की, जेव्हा रोल्स रॉयसच्या इंजिनियर्सनी रोड आणि व्हायब्रेशन टेस्ट केले, तेव्हा साऊंड लेवल अत्यल्प असल्याचे त्यांच्या ध्यानात आले. आपण वापरलेले फिचर्स योग्य पद्धतीने काम करताहेत की नाही यासाठी त्यांनी ही चाचणी केल्याचे कंपनीने म्हटले आहे.

कारमध्ये ६.७५ लीटरवाले ट्विन टर्बो चार्ज्ड व्ही१२ इंजिन ५६३ बीएचपीची पॉवर आणि ९०० न्यूटन मीटर टॉर्क निर्माण करण्याची क्षमता आहे. या कारला ८ स्पीड, सॅटेलाईट-एडेड ट्रान्समिशनच्या सहाय्याने ० ते १०० किलोमीटर प्रतितास वेग धारण करण्यासाठी केवळ ५.४ सेकंद इतका वेळ लागतो.

Leave a Comment