५ जी नेटवर्कची एअरटेलकडून यशस्वी चाचणी


मुंबई – ५ जी नेटवर्कची प्रायोगिक चाचणी यशस्वी झाल्याची घोषणा चीनची तंत्रज्ञानविषयकची मोठी कंपनी हुवाई आणि भारती एअरटेलने केली असून एअरटेलच्या नेटवर्कद्वारे मनेसरमध्ये (गुरुग्राम) ही चाचणी घेण्यात आली. यावेळी ३ जीबीपीएसहून जादा स्पीड मिळाल्याचा दावा कंपनीने केला आहे.

याबाबत माहिती देताना भारती एअरटेलच्या नेटवर्कचे संचालक अभय सावरगावकर यांनी सांगितले, की ५ जीच्या इंटरऑपरेबिलीटी अॅण्ड डेव्हलपमेंट टेस्टींग तंत्रज्ञानाबाबत आम्ही वेगाने पुढे जात आहोत. आम्ही भागीदारासोबत रोबोटिक यंत्रणा तयार करत असून नुकत्याच घेतलेल्या चाचणीतून ३.५ गिगाहार्टझ ते १०० मेगाहार्टझच्या बॅंण्डविथची चाचणी घेतल्याचे कंपनीने म्हटले आहे. यावेळी एंड टू एंड नेटवर्क लॅटन्सी एक मिलिसेकंद नोंदविण्यात आली. ५ जीची चाचणी ही देशातील दूरसंचार क्रांतीत मैलाचा दगड ठरण्याची चिन्हे आहेत.

Leave a Comment