जाहिरात दोन पक्षांची पण जाहिरातीतील लाभार्थी ‘सेम टु सेम’


योजनांपेक्षा जाहीरातबाजीवरच विद्यमान सरकार डोंगराएवढा खर्च करत असल्याचे आरोप आपण अनेकदा ऐकत आलो आहोत असतो. राजकीय पक्षांच्या जाहिरातबाजींचे भलेमोठे पोस्टर आपल्याला देशाच्या कोणत्याही गल्लीबोळ्यात गेले तरी दिसतील. पण या जाहीरातबाजी दरम्यान घोळही होऊ शकतो. याचा प्रत्यय आम आदमी पक्ष आणि भाजपने लावलेल्या बॅनरवरून आला आहे. भाजपने नागरिकांना गॅस सबसीडी सोडवी यासाठी आवाहन करणारी जाहिरात केली होती.

तर दुसरीकडे तीन वर्षांत सरकारने केलेल्या बदलाचा आढावा दिल्ली सरकारने जाहिरातीत मांडला होता. आपापल्या परीने दोन्हीही पक्षांनी जाहिरातबाजी केली. पण यात एक मोठी गफलत झाली आणि सोशल मीडियावर या दोन्ही पक्षांचे बॅनर ट्रोल होऊ लागले आहे. दोन्ही पक्षांनी जाहिरातीत दाखवलेले लाभार्थी अगदी सेम टु सेमच होते. त्यात फरक एवढाच होता की जाहिरातीवरील पक्ष वेगवेगळे होते.


आता ही जाहिरात ज्यांनी डिझाइन केली त्याच्या किंवा अगदी पक्षाच्याही ही बाब लक्षात आली नाही. पण, बरीच स्मार्ट लाभार्थी जनता असल्याने हा घोळ त्यांच्या नजरेतून काही न सुटल्यामुळे आप आणि भाजपची ही सेम टु सेम जाहिरातीची सोशल मीडियावर चांगलीच चर्चा रंगली आहे.

Leave a Comment