रोबोट सोफियाला आवडतो शाहरुख खान


माणसाप्रमाणे दिसणाऱ्या रोबोट सोफियाने शाहरुख खान हा माझा आवडता हिरो असल्याची प्रतिक्रिया दिली आहे. रोबोट सोफिया हैदराबाद येथे वर्ल्ड काँग्रेस ऑन टेक्नॉलॉजीमध्ये पोहचली असून या रोबोटशी त्यावेळी संवाद साधण्यात आला. सोफियाला या संवादा दरम्यान तुझा आवडता अभिनेता कोण? असा प्रश्न विचारण्यात आला. सोफियाने प्रश्न ऐकल्यानंतर क्षणाचाही विलंब न करता शाहरुख खान असे उत्तर दिले. उपस्थितांनी हे उत्तर ऐकून टाळ्यांचा कडकडाट केला. तिने त्यानंतर महिला अधिकाऱ्यांसाठी आपल्याला काम करायचे असल्याचेही म्हटले आहे. सौदी अरेबियाचे नागरिकत्त्व सोफियाला मिळाले असून सोफिया ही एखाद्या देशाचे नागरिकत्त्व मिळालेली पहिली रोबोट ठरली आहे.

हाँगकाँगच्या हेन्सन रोबोटिक्सने माणसांप्रमाणे दिसणा-या ‘मोस्ट ह्युमनॉयड रोबोट’ सोफियाची निर्मिती केली आहे. चेहऱ्यावरचे हावभाव सोफिया ओळखू शकते. तसेच माणसांप्रमाणेच संवादही साधू शकते. सोफियाचे फेसबुक अकाऊंटही आहे. ट्विटरवरही सोफिया अॅक्टिव्ह आहे.

Leave a Comment