‘अॅपल’च्या जाहिरातीवर झळकणार ए. आर. रहमान


आज सर्वाधिक चर्चिला जाणारा आणि अनेकांच्या पसंतीस उतरणारा ब्रॅंड म्हणजे ‘अॅपल’ हा ब्रँड असून या ब्रॅंडकडे कोणीही ‘स्टेटस सिम्बॉल’ म्हणून पाहते. स्मार्टफोन आणि काही अफलातून गॅजेट्स उपलब्ध करुन देणाऱ्या या ब्रँडच्या जाहिरातीसुद्धा लक्षवेधी असतात. चक्क संगीतकार ए.आर.रहमान अशा या ब्रँडच्या एका जाहिरातीवर झळकला आहे. याविषयीची माहिती खुद्द रहमाननेच ट्विट करत दिली.

जगभरातील रसिकांना आपल्या संगीताने मंत्रमुग्ध करणाऱ्या रहमानने ‘अॅपल’लाही भुरळ घातली असे म्हटले तर वावगे ठरू नये. आयफोनच्या जाहिरातीसाठी रहमानच्या एका कृष्णधवल सेल्फीची निवड करण्यात आली असून, तो या ब्रॅंडच्या प्रमोशनसाठी निवडला गेलेला पहिला भारतीय सेलिब्रिटी ठरला आहे.


रहमान एक चांगला संगीतकार तर आहे पण त्यासोबतच तो एक चांगला छायाचित्रकारही आहे. त्याने सोशल मीडियावर पोस्ट केलेले फोटो पाहता याचा प्रत्यय येतो. जाहिरातील काढलेला तो सेल्फी रहमानने आयफोनच्याच माध्यमातून काढला आहे.

Leave a Comment