जगातले सर्वात मोठे उलटे घर उफामध्ये


जगात अनेक प्रकारांनी घरे बांधली गेली आहेत. अगदी खाली छत वर पाया अशी उलटी घरेही जगात आहेत. याच प्रकारातले जगातील सर्वात मोठे उलटे घर रशियातील उफा येथे बांधले गेले असून ते पाहण्यासाठी पर्यटकांची मोठी गर्दी होत आहे. हे घर युनिक म्हणजे एकमेव आर्टवर्क म्हणून प्रसिद्धीस आले आहे. या घराच्या बांधकामासाठी अडीच कोटी रुपये खर्च आला आहे.

प्रथमच हे घर पाहणाऱ्याला बिल्डरची काही चूक झाली असावी असे वाटते. मात्र ते जाणूनबुजून तसे बांधले गेले आहे हे समजले की बिल्डरच्या बुद्धीचे कौतुक वाटते. हे घर बांधण्यासाठी १०० मजूर काम करत होते. या घराचे सिलिंग म्हणजे छत हवेत आहे व पाया जमिनीवर आहे. एकावेळी ५० लोक येथे मावू शकतात. येथे पार्किंग मध्ये असलेली कारही उलटी आहे. घरातील सर्व फर्निचर उलटे आहे इतकेच काय फ्रीझही उलटाच आहे.

या घरात किचन, लिव्हिंग रूम, हॉल, नर्सरी, स्टडी रूम, बाथरूम्स असून ते ३०० चौरस मीटर जागेत आहे. या घरात आपल्या दृष्टीने जमिनीवर असलेली एकमेव वस्तू आहे घरातील झुंबर. बाकी सर्व वस्तू उलट्या म्हणजे घराच्या जमिनीवर म्हणजे आपल्या दृष्टीने छताला लागलेल्या आहेत.

Leave a Comment