या फिचरच्या माध्यमातून वाचला जाऊ शकतो व्हॉट्सअॅपचा डिलीट केलेला मेसेज


नवी दिल्ली : मागील वर्षाच्या नोव्हेंबरमध्ये व्हॉट्सअॅपचे ‘Delete For Everyone’ हे फीचर रोलआऊट करण्यात आले होते. पण आता या फीचरबाबत नवी माहिती समोर आली असून तुम्ही मेसेज डिलीट केला तरीही त्या मेसेजला कोट करत रिप्लाय केल्यानंतर तो मेसेज दिसत राहतो. एखादा मेसेज चुकीने सेंड झाल्यास तो डिलीट करता यावा, यासाठी हे फीचर देण्यात आले होते. हा मेसेज चुकीच्या व्यक्तीला गेल्यानंतर सात मिनिटांच्या आत तो डिलीट करता येतो. अशा मेसेजच्या जागी डिलीटेड मेसेज असे दिसते. या फीचरबाबत समोर आलेल्या नव्या माहितीनुसार, तुम्ही डिलीट केलेला मेसेजही वाचला जाऊ शकतो. याचा सर्वात मोठा धोका ग्रुपमध्ये असून एखाद्या युझरने तुम्ही मेसेज डिलीट करण्यापूर्वी त्याला कोट करुन रिप्लाय दिलेला असेल तर तो सारखा दिसत राहिल.

Leave a Comment