काय असतात आपल्या शरीरामधील फ्री रॅडीकल्स ?


आपल्या शरीरामध्ये लाखोंच्या संख्येने कोशिका आहेत. या कोशिकांना अपुऱ्या पोषणाचा आणि संक्रमणाचा धोका तर असतोच, पण त्याशिवाय आपल्या शरीरामध्ये असलेले फ्री रॅडीकल्स देखील या कोशिकांना मोठे नुकसान पोहोचवू शकतात. हे रॅडीकल्स शरीरातील दुसऱ्या अणूंकडून इलेक्ट्रॉन्स काढून घेण्याचा प्रयत्न करतात. ह्यामुळे आपल्या शरीरातील डीएनए चे आणि इतर अणूंचे मोठ्या प्रमाणावर नुकसान होत असते. असे घडल्याने आपल्या शरीरामध्ये गंभीर व्याधी उद्भविण्याची शक्यता असते.

जेव्हा आपण घेतलेल्या भोजनाचे रूपांतर आपले शरीर ऊर्जेमध्ये करीत असते, तेव्हा या प्रक्रियेमधून फ्री रॅडीकल्स ही उत्पन्न होतात. अन्नातून उर्जा निर्माण करताना जे फ्री रॅडीकल्स शरीरामध्ये नव्याने तयार होत असतात, त्या व्यतिरिक्त काही प्रमाणामध्ये फ्री रॅडीकल्स शरीरामध्ये आधीपासूनच तयार झालेले असतात. आपल्या आसपासच्या वातावरणामध्ये देखील काही फ्री रॅडीकल्स असतात. हे फ्री रॅडीकल्स निरनिराळ्या आकारांचे असून यांचे रासायनिक संगठन देखील निरनिराळे असते. ह्यांच्यामुळे आपल्या शरीरातील कोशिका नष्ट होऊन हृदय रोग, कर्करोग यांच्यासारखे घातक विकार शरीरामध्ये उद्भवू लागतात. अश्या वेळी अँटी ऑक्सिडंट्स फ्री रॅडीकल्स मुळे होणाऱ्या दुष्परिणामांपासून कोशिकांचा बचाव करण्यास समर्थ असतात.

त्यामुळे आपले शरीर निरोगी ठेवायचे असल्यास आपल्या आहारामध्ये भरपूर प्रमाणात अँटी ऑक्सिडंट्स असलेल्या अन्नपदार्थांचा समावेश करायला हवा. ताजी फळे, भाज्या, यांमध्ये अँटी ऑक्सिडंट्स मोठ्या प्रमाणात सापडतात. ह्यांच्या सेवनामुळे शरीराची रोगप्रतिकारशक्ती चांगली राहते. त्यामुळे ही तत्वे असलेले अन्नपदार्थ नियमितपणे आपल्या आहारामध्ये समाविष्ट करणे अगत्याचे आहे.

Disclaimer: आरोग्य विषयक लेखात दिली गेलेली माहिती प्राथमिक स्वरुपाची आहे. हि माहिती वैद्यकीय सल्ल्याचा पर्याय होऊ शकत नाही  या माहितीचा उपयोग करण्यापूर्वी आपण डॉक्टर अथवा वैद्यकीय तज्ञाकडून खात्री करून घ्यावी. या माहितीची जवाबदारी माझा पेपर घेत नाही

Leave a Comment