या भारतीयाने रचला अनोखा विक्रम; पहा व्हिडीओत


नवी दिल्ली: गिनीज बुकात आपले देखील नाव यावे यासाठी लोक काय करतील याचा नेम नाही. काही तरी विचित्र करून ते आपले नाव जगात झळकावे अशी इच्छा उरी बाळगतात. असेच काहीसे मुंबईतील एका माणसाने केले आहे. या व्यक्तीने टॉमॅटो सॉससोबत असे काही केले कि ज्यानंतर त्याच्या नावाची दखल अखेर गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये घ्यावे लागले. मुंबईत राहणारा दिनेश शिवनाथ उपाध्याय याने टॉमॅटो सॉस संपूर्ण बाटली एक झटक्यात फस्त केली आहे. होय, पण त्याने ही बाटली ‘स्ट्रॉ’च्या मदतीने २५.३७ सेकंदात पूर्ण रिकामी केली. गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डने हा व्हिडिओ युट्युब वर पोस्ट केला आहे.

पात्र होण्यासाठी, त्यांना ३९६ ग्रॅमची बाटली ९५ टक्के इतकी लवकर संपवावी लागणार होती. रेकॉर्ड्सच्या मते, त्यांना एका काचेच्या बाटलीतून सॉस पिणे आवश्यक होते, स्वाझी बाटल्यांचा वापर करण्यास मनाई करण्यात आली होती.

हा व्हिडिओ ९ फेब्रुवारी रोजी अपलोड करण्यात आला असून आतापर्यंत ३ लाखांहून लोकांनी हा व्हिडीओ पाहिला आणि ३ हजारांपेक्षा जास्त पसंती प्राप्त झाली आहे. कमेंटमध्ये लोकांनी वेगळा प्रतिसाद दिला आहे. एका वापरकर्त्याने लिहिले आहे कि, मी एवढ्या गतीने पाणी पिऊ शकत नाही. विक्रमी शीर्षक जिंकल्यानंतर त्याने लिहिले आहे कि, मी स्वतःला सिद्ध करू इच्छित होतो आणि मला जगामध्ये माझे नाव उज्वल करायचे होते.

Leave a Comment