डिजिटल पेमेंटच्या क्षेत्रात येण्यासाठी व्हॉट्सअ‍ॅपने अनेक अनुचित गोष्टींचा केला वापर


नवी दिल्ली : देशातील सर्वात मोठी डिजिटल पेमेंट कंपनी पेटीएम (Paytm) व्हॉट्सअ‍ॅपच्या डिजिटल पेमेंट सिस्टम लॉन्च केल्यानंतर व्हॉट्सअ‍ॅप विरोधात अपील दाखल करण्याच्या तयारीत असून याबाबत पेटीएमचे संस्थापक आणि सीईओ विजय शेखर शर्मा म्हणाले की, त्यांची कंपनी व्हॉट्सअ‍ॅपच्या डिजिटल पेमेंट सर्व्हिस विरोधात यूपीआयकडे अपील करणार आहे. ते म्हणाले की, डिजिटल पेमेंटच्या क्षेत्रात येण्यासाठी इंस्टंट मॅसेजिंग अ‍ॅप व्हॉट्सअ‍ॅपने अनेक अनुचित गोष्टींचा वापर केला आहे.

व्हॉट्सअ‍ॅप नव्या फीचरला सुरक्षेच्या दृष्टीने धोकादायक असल्याचे विजय शेखर शर्मा यांनी म्हटले आहे. ते म्हणाले की, डिजिटल देवाण-घेवाणाच्या सुरक्षेवर व्हॉट्सअ‍ॅपचे हे फीचर सुरू झाल्याने प्रश्न उपस्थित होऊ शकतात. त्यांनी आरोप लावला आहे की, डिजिटल पेमेंटच्या क्षेत्रात उतरण्यासाठी व्हॉट्सअ‍ॅपने नियमांचे पालन केले नाही. पेटीएमचे सीईओ म्हणाले की, व्हॉट्सअ‍ॅपने पैसे पाठवण्यासाठी लॉग-इन आणि आधार कार्डची अनिवार्यता केली गेली नाही.

या विरोधात नॅशनल पेमेंट कॉर्पोरेशन ऑफ इंडियाकडे पेटीएम तक्रार करण्यात येणार असे सांगितले आहे. एनपीसीआयनेच यूपीआय सिस्टमला तयार केले आहे. पेटीएमचे सीईओ म्हणाले की, नियमांमध्ये व्हॉट्सअ‍ॅपने त्यांच्या गरजेनुसार फेरबदल केले आहेत. ते म्हणाले की, व्हॉट्सअ‍ॅपने त्यांचे ट्रायल सुरू केले आहे. पेमेंट फीचरचे ट्रायल वापरण्याचे लाखों यूजर्सना स्वातंत्र्य दिले आहे.

Leave a Comment