भारतीय रेल्वेत मेगा कर्मचारी भरती


नवी दिल्ली – ८९ हजार कर्मचारी भरती भारतीय रेल्वेकडून करण्यात येणार असून या प्रक्रियेला प्रारंभ करण्यात आला आहे. क आणि ड प्रवर्गातील कर्मचाऱयांची भरती करण्यात येणार आहे. साहाय्यक लोको पायलट, तंत्रज्ञान, गँगमॅन, स्विचमॅन, ट्रकमॅन, कॅबिनमॅन, वेल्डर्स, मदतनीस, पोटर्स या पदांचा यामध्ये समावेश आहे.

याबाबत केंद्रीय रेल्वेमंत्री पियूष गोयल यांनी दिलेल्या माहितीनुसार ६२९०७ कर्मचारी ड प्रवर्गात भरती करण्यात येणार आहे. या प्रवर्गातील कर्मचा-यांचे शिक्षण बारावी पूर्ण आणि आयआयटी डिप्लोमा असणे आवश्यक आहे. ही भरती रेल्वे रिप्रुटमेन्ट सेलमार्फत करण्यात येणार असून १८ ते ३१ वयोगटातील डिप्लोमाधारकांना १२ मार्चपर्यंत अर्ज करता येईल. सेवेत समाविष्ट करण्यात येणा-यांना १८ हजार मासिक वेतन आणि सातव्या वेतन आयोगाच्या शिफारसीनुसार भत्ता देण्यात येईल.

सहाय्यक लोको पायलट आणि तंत्रज्ञान क्षेत्रासाठी क प्रवर्गातील २६५०२ पदे जागा आहेत. रेल्वेकडून अधिक भर सुरक्षा मजबूत करण्यासाठी देण्यात येईल. यामुळे रेल्वेच्या तिजोरीवर ३ हजार ते ४ हजार कोटी रुपये वार्षिक भार पडणार आहे. भारतीय रेल्वेतील ४० हजार ते ४५ हजार पदे दरवर्षी निवृत्तीमुळे रिक्त होतात. चालू आर्थिक वर्षात ५६ हजार कर्मचारी निवृत्त होतील.

Leave a Comment