पीएनबी गैरव्यवहारप्रकरणी तिघांना अटक


मुंबई – पंजाब नॅशनल बँकेचे निवृत्त अधिकारी गोकुलनाथ शेट्टी, बँकेचे सिंगल विंडो ऑपरेटर मनोज खरात आणि नीरव मोदी ग्रुप फर्मच्या सिग्नेटरी ऑर्थराईज व्यक्ती हेमंत भट यांना सीबीआयने पंजाब नॅशनल बँक गैव्यवहार प्रकरणी अटक केली आहे. आज सीबीआयच्या विशेष न्यायालयात या सर्व आरोपींना हजर केले जाणार आहे.

ईडीकडून हजारो कोटी रुपयांच्या पंजाब नॅशनल बँक गैरव्यवहाराबाबत आरोपी नीरव मोदींच्या संपत्तीवर देशभरात छापे मारण्यात आले होते. त्यानंतर आता या प्रकरणाशी संबंधित असलेल्या बँक कर्मचाऱ्यांना ताब्यात घेतले आहे. सीबीआयच्या सूत्रांनुसार पंजाब नॅशनल बँकेत झालेल्या गैरव्यवहारात बँकेला ४८८६.७२ कोटींचा तोटा झाला असून सीबीआयने दाखल केलेल्या गुन्ह्यात गीतांजली जेम्स, गिली इंडिया आणि नक्षत्र ब्रँडच्या कंपनीचा समावेश आहे.

Leave a Comment