
व्हॅलेंटाइन डे म्हणजे १४ फेब्रुवारीला चीनी मोबाईल जायंट कंपनी शिओमी त्याच्या रेडमी नोट ५, फाईव्ह प्रो आणि एमआय टीव्ही ४ चे लाँचिंग करत असल्याचे काही रिपोर्टवरून समजले आहे. आज दुपारी १२ वा. होणाऱ्या इवेन्टमध्ये हे लाँचिंग केले जाणार आहे.
व्हॅलेंटाइन डे दिवशी शिओमीच्या रेडमी नोट फाईव्हचा धमाका
विशेष म्हणजे फ्लिपकार्टने अगोदरच रेडमी नोट ५ हँडसेट उपलब्ध असल्याचे संकेत दिले आहेत. लिक झालेल्या माहितीनुसार रेडमी नोट ५ ची दोन व्हर्जन येत आहेत. ५.२ इंची डिस्प्ले असलेल्या या फोन चे ३ जीबी, ३२ जीबी मेमरी व ४ जीबी ६४ जीबी मेमरी अशी दोन व्हर्जन आहेत. याचवेळी नोट मी ५ प्रो व्हर्जनही सादर केले जात असल्याचे समजते. २० एमपीचा फ्रंट कॅमेरा, अँड्राईड नुगा ७.१ ओएस अशी त्याची अन्य फीचर्स असतील.
कंपनीने चीनमध्ये नुकताच लाँच केलेला मी टीव्ही ४ भारतातही सादर केला जात असल्याचे संकेत दिले गेले आहेत.
