मुकेश अंबानींच्या संपत्तीवर २० दिवस चालेल सरकारचा खर्च


कल्पना करा की काही कारणाने सरकारचे उत्पन्नाचे सर्व स्रोत संपुष्टात आले आणि देशातील सर्वाधिक श्रीमंत व्यक्तीला त्याच्या संपत्तीतून देशाचा खर्च चालविण्याची वेळ आलीच तर किती दिवस सरकारचा खर्च चालू शकेल? अर्थात आपल्याला हा गहन विचार करण्याची जरुरी नाही कारण आपल्यासाठी हे काम ब्लूमबर्गने केले आहे. त्यांनी अश्या परीस्थितीत कोणत्या देशाचा खर्च त्या देशातील व्यक्ती तिच्या पैशातून किती दिवस चालवेल याचा रिपोर्ट सादर केला आहे. रॉबिनहूड इंडेक्स नावाने हा अहवाल आला असून त्यात ४९ देशांचा समावेश आहे.

भारतापुरते बोलायचे तर आपल्या देशातील श्रीमंत म्हणजे मुकेश अंबानी त्याच्या ४०.३ अब्ज डॉलर्स संपत्तीतून भारत सरकारचा २० दिवसांचा खर्च चालवू शकतील. ग्रेट अमेरिकेतील सर्वाधिक श्रीमंत जेफ बेजोस त्याच्या ९९ अब्ज डॉलर मालमत्तेतून फक्त ५ दिवस खर्च चालवू शकतील तर सायप्रस या छोट्याश्या देशातील सर्वात श्रीमत जॉन फ्रेडरिक त्याच्या १० अब्ज डॉलर्स संपत्तीतून तब्बल १ वर्ष देशाचा खर्च करू शकतील.

या यादीत सामील असलेल्या देशांच्या श्रीमंतात चार महिलांचाही समावेश आहे. त्या अंगोला, ऑस्ट्रेलिया, चिले आणि नेदरलँड्स देशाचे प्रतिनिधित्व करतात. सर्वात महाग देशांच्या यादीत जपान, पोलंड, अमरिका आणि चीन या देशांचा समावेश असून चीनमधील सर्वात श्रीमंत अलीबबाचे जॅक मा त्यांच्या ४५.५ अब्ज डॉलर्स संपत्तीतून केवळ चार दिवस सरकारी खर्च चालवू शकतील.

Leave a Comment