व्हॅलेंटाइंन्स डे निमित्त चक्क ‘ बॉयफ्रेंड ऑन रेंट ‘!


व्हॅलेंटाइंन्स डे हा दिवस प्रेमी युगुलांसाठी अगदी खास समजला जातो. प्रेमीजन आपापल्या जोडीदारासोबत हा दिवस साजरा करण्यासाठी तऱ्हे – तऱ्हेची सरप्राईझेस योजताना दिसतात. दिवसभराची पिकनिक, एखाद्या छानशा रेस्टॉरंट मध्ये रोमँटिक डिनर, खूप साऱ्या भेटी, फुले आणि बरेच काही. आजकाल पुष्कळ प्रेमी युगुले पारंपारिक फुले किंवा चॉकोलेट्स या भेटी आपल्या जोडीदाराला देण्याऐवजी आपल्या जोडीदाराचे नाव आपल्या हातावर गोंदवून घेणे पसंत करतात. व्हॅलेंटाईन्स डे निमित्त दिलेली ही भेट खरोखरच आगळी वेगळी म्हणायला हवी. पण ज्या मुलींना बॉयफ्रेंड नाही, त्यांनी पपरस्परांवरील प्रेमभावना व्यक्त करण्यासाठी असलेल्या या खास दिवशी काय करावे?

हरियाणामधील गुरूग्राम ( गुडगाव ) येथील एका तरुणाने ह्या समस्येचे निदान केले आहे. ज्या तरुणींना व्हॅलेंटाईन डे साजरा करायचा आहे, पण तो कोणाबरोबर साजरा करावा असा प्रश्न ज्यांना पडला आहे, त्या तरुणींना आता खास व्हॅलेंटाईन्स डे निमित्त चक्क बॉयफ्रेंड भाड्यावर घेता येणार आहे. आजवर व्हॅलेंटाईन्स डे निमित्त प्रेमी युगुले फिरायला जाण्यासाठी एखादी खास गाडी भाड्यावर घेताना पाहायला मिळत असत, पण बॉयफ्रेंड भाड्यावर घेण्याची ही कल्पना अभिनव म्हणावी लागेल. गुरुग्राम येथील शकुल गुप्ता याने एक ठराविक रक्कम घेऊन त्या बदल्यात एक दिवसाचा बॉयफ्रेंड बनण्याची तयारी दर्शविली आहे.

शकुलच्या या अभिनव ‘ बॉयफ्रेंड ऑन रेंट ‘ या स्कीम मध्ये चार निरनिराळी पॅकेजेस असणार आहेत. यामध्ये जोडीदाराच्या हातात हात घालून फिरायला जाण्यापासून ते जोडीदारासाठी जेवण बनविण्यापर्यंत हर तऱ्हेची सेवा उपलब्ध करून देण्यात आली आहे. या प्रत्येक सेवेचे अर्थातच भले मोठे शुल्क आकारण्यात येणार आहे. शकुलने या स्कीमवर ‘ प्रोमो कोड ‘ ही दिले असून, सर्वप्रथम बुकिंग करणाऱ्या तरुणींना सर्व सेवांवर वीस टक्के सूट देखील देण्यात येणार आहे. शकुलच्या या अभिनव स्कीमच्या उत्तरादाखील तब्बल दोन हजार अर्ज आले आहेत. यातील पाच तरुणींची शकुलने निवड केली असल्याचे समजते.

Leave a Comment