नवी दिल्ली – आज (बुधवारी) आपले तिमाही पतधोरण रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने जाहीर केले असून कोणतेही बदल यामध्ये रेपो रेट आणि रिव्हर्स रेपो रेटमध्ये करण्यात आलेले नाहीत. रेपो रेट ६ टक्के तर रिव्हर्स रेपो रेट ५.७५ टक्के हाच कायम ठेवण्यात आला आहे. याचा अर्थ ग्राहकांचे बँक लोन स्वस्त होणार नाही. त्यासोबतच इएमआयमध्ये कोणताही दिलासा मिळणार नाही. महागाई दर ४ टक्क्यांच्या रेंजमध्ये ठेवण्याच्या दृष्टीने मॉनिटरी पॉलिसी कमिटीने (एमपीसी) हा निर्णय घेतला आहे.
रिव्हर्स रेपो रेट आणि बँक रेट मध्येही कोणताही बदल नाही
याशिवाय एमपीसीने कोणताही बदल रिव्हर्स रेपो रेट आणि बँक रेट मध्येही केलेला नाही. रिव्हर्स रेपो रेट ८.७५ टक्के आणि बँक रेट ६.२५ टक्के आहे. मॉनिटरी पॉलिसी स्टेटमेंटमध्ये रिझर्व्ह बँकचे गव्हर्नर ऊर्जित पटेल यांनी म्हटले आहे, की आर्थिक उलाढाल वाढली असल्यामुळे वाढत्या खर्चाचा बोजा ग्राहकांवर टाकला जाईल. त्यामुळे किंमती वाढू शकतात. याशिवाय महागाई किती वाढेल हे बहुतांश मान्सूनवर अवलंबून राहिल. शक्यता आहे की आगामी मान्सून सामान्य राहिल.