प्रेमासंबंधी काही मजेदार तथ्ये


प्रेम व्यक्त करण्याची संधी देणारा व्हॅलेंटाइन डे साजरा करण्याची सुरवात झाली आहे. हे प्रेम म्हणजे नक्की काय आणि आपल्याला एखाद्याविषयी खरेच प्रेम आहे हे ओळखायचे कसे असा प्रश्न पडत असेल त्यांनी प्रेमासंबंधीची काही तथ्ये जाणून घ्यायला हवीत.

एखाद्या व्यक्तीबद्दल आपण सतत विचार करत असू तर ती व्यक्तीही तुमचा विचार करत असते असे संशोधन सांगते. इतकेच नाही तर आपली संबंधित व्यातीसंबंधीची फिलिंग्स जितकी अधिक तितके प्रेम वाढते. एखादी व्यक्ती नेहमी सुखात असावी अशी आपली भावना असेल तर नक्की समजा तुम्ही त्याच्यावर प्रेम करत आहात. असेही म्हणतात कि सर्वसामान्य माणूस लग्नापूर्वी किमान सातवेळा तरी कुणाच्या ना कुणाच्या प्रेमात पडलेला असतो.

तरुणाईचा विचार केला तर मुले आय लव्ह यु म्हणायला फारसा वेळ घेत नाहीत तुलनेने मुली हेच वाक्य उच्चारायला बराच वेळ घेतात. ब्रेकअप चा त्रास पुरुषांना अधिक होतो. एखाद्या मुलीने तुम्ही तिला प्रपोज केल्यावर नकार दिला तर हृदयात जखम झाल्यासारख्या वेदना होतात असे अनुभव मुले सांगतात. १८ ते २० या वयोगटात होणारे ब्रेकअप अधिक दुखःकारक असतात.

पतीपत्नीमधील प्रेमाचीही काही गणिते आहेत. जॉ पती आपल्या पत्नीसोबत दिवसाकाठी किमान १० मिनिटे हास्यविनोदात घालवितात त्यांचे नाते नेहमी चांगले राहते. जे पती सकाळी सकाळी पत्नीचे चुंबन घेतात ते पाच वर्षे अधिक आयुष्य जगतात. प्रेम माणसाच्या मेंदूव अमली पदार्थाप्रमाणे काम करते. आपल्या प्रेमीला गळामिठी मारणे पेनकिलर घेण्याप्रमाणे असते. कारण या मुळे टेन्शन, स्ट्रेस कमी होतो. व्हॅलेंटाइन डे च्या दिवशी कैदीही तुरुंगातून पलायन करून आपल्या प्रेमीने भेटायला जाण्याचे प्रमाण वाढते असे सर्व्हेक्षण सांगते.

Leave a Comment