रात्री झोप लागत नसल्यास हे अन्नपदार्थ करा आपल्या आहारातून वर्ज्य


अनेक व्यक्तींना रात्री व्यवस्थित झोप लागत नाही. ह्याचा संबंध त्यांच्या शरीरावर आणि मनावर ताण असल्याशी आहे हे ओळखून या व्यक्ती हर तऱ्हेचे उपाय योजतात. अगदी डॉक्टरांच्या सल्ल्याने औषधपचार देखील सुरु होतात. पण तरीही रात्रीची निवांत झोप त्यांना हुलकावण्या देत असते. जर असे असेल, तर अश्या व्यक्तींनी आपल्या आहाराकडे लक्ष देण्याची आवश्यकता आहे. आपण जे खात पीत असतो, त्याचा थेट संबंध आपल्या झोपेशी आणि एकंदर आरोग्याशी असतो. आपल्या आहारामध्ये असणारे काही अन्नपदार्थ आपल्या शरीरासाठी आवश्यक असले, तरी चुकीच्या वेळी या पदार्थांचे सेवन केल्याने या पदार्थांमुळे आपली नर्व्हस सिस्टम उत्तेजित होते. परिणामी रात्री शांत झोप लागत नाही. त्यामुळे काही पदार्थांचे सेवन रात्रीच्या झोपेच्या आधी काही काळ करणे टाळायला हवे.

कॅफिनच्या सेवनाने स्ट्रेस हार्मोनच्या पातळीमध्ये वाढ होते. स्ट्रेस हार्मोन्स च्या पातळीमध्ये सातत्याने वाढ होत राहिली, तर त्या व्यक्तीला पॅनिक अटॅक येण्याचा संभवदेखील वाढतो. अश्या परिस्थितीत ती व्यक्ती लहानशा गोष्टींनी देखील अतिशय अस्वस्थ होते. कित्येक वेळा कामांत असताना झोप येऊ नये म्हणून काही व्यक्ती वारंवार कॉफी पीत राहतात. त्यातील कॅफिनमुळे मेंदूमधील अॅडेनोइड रीसेप्टर्स ब्लॉक होतात. कॅफिनचे सेवन केल्यानंतर ते आपल्या शरीरातून बाहेर पडण्यासाठी किमान चोवीस तासांचा अवधी लागतो. त्यामुळे आपल्या आहारातून, विशेषतः झोपेपूर्वी कॅफिनच्या सेवनावर नियंत्रण ठेवण्यास हवे.

वांगी, बटाटे, टोमॅटो, काळी मिरी या पदार्थांना ‘ नाईट शेड ‘ असे म्हटले जाते. ह्या पदार्थांमुळे शरीरामध्ये ग्लायकोकलॉइड्स निर्माण होऊन मानवी पेशींवर यांचे नकारात्मक परिणाम होत असतात. ह्या पदार्थांमुळे नर्व्हस सिस्टम उत्तेजित होते, पव परिणामी शांत निद्रा येऊ शकत नाही. या पदार्थांच्या सेवनाने निर्माण झालेली ग्लायकोकलॉइड्स शरीरातून बाहेर पडण्यासाठी किमान पाच ते सात दिवसांचा अवधी लागतो. तसेच झोपेपूर्वी मद्यपान केल्याने ही निद्रा शांत लागत नाही. त्यामुळे रात्री झोपण्यापूर्वी मद्यपान करणे टाळायला हवे.

बाजारातून तयार आणलेले योगर्ट (दही), फळांचे रस, आणि सिरियल्स ( कॉर्न फ्लेक्स सम पदार्थ ) या मध्ये असलेल्या शुगरला रिफाईन्ड कार्बोहायड्रेट म्हटले जाते. ह्या पदार्थांच्या सेवनाने रक्तातील साखरचे प्रमाण वाढते आणि शरीरामध्ये उर्जा निर्माण होते. त्यामुळे हे पदार्थ सकाळच्या वेळी नाश्त्यामध्ये खाणे जास्त चांगले असते. या पदार्थांद्वारे मिळणारी उर्जा दिवसभराच्या कामासाठी उपयोगात आणली जाते. मात्र हे पदार्थ रात्री सेवन केल्याने शरीरातील कॉर्टीसोलच्या मात्रेमध्ये वाढ होते. हा स्ट्रेस हार्मोन आहे. ह्याच्या पातळीमध्ये वाढ झाल्याने रात्री शांत झोप लागत नाही.

रात्रीच्या वेळी ‘फर्मेंट’ केलेले किंवा ‘स्मोक’ केलेल्या पदार्थांचे सेवन करू नये. फर्मेन्टेशन म्हणजे, ताज्या अन्नपदार्थामध्ये बॅक्टेरिया निर्माण करण्याची क्रिया. यामुळे पदार्थाची चव बदलते. हे बॅक्टेरिया आपल्या आहारातील प्रोटीन विभागून त्यांचे रूपांतर लहान लहान मॉलीक्युल्स मध्ये करतात. ह्या मॉलीक्युल्समुळे आपल्या शरीराच्या पचनक्रियेवर, हृदयावर आणि नर्व्हस सिस्टमवर विपरीत परिणाम होत असतात. त्यामुळे आपल्या शरीरामध्ये बेचैनी वाढते आणि रात्री शांत झोप लागत नाही. त्यामुळे वाईन सारख्या मद्याचे सेवन रात्री टाळायला हवे.

Disclaimer: आरोग्य विषयक लेखात दिली गेलेली माहिती प्राथमिक स्वरुपाची आहे. हि माहिती वैद्यकीय सल्ल्याचा पर्याय होऊ शकत नाही  या माहितीचा उपयोग करण्यापूर्वी आपण डॉक्टर अथवा वैद्यकीय तज्ञाकडून खात्री करून घ्यावी. या माहितीची जवाबदारी माझा पेपर घेत नाही

Leave a Comment