रिलायन्स जिओने आणली आपल्या युजर्ससाठी बंपर ऑफर


नवी दिल्ली : आपल्या ग्राहकांसाठी रिलायंस जिओने आणखी एक बंपर ऑफर सादर आणली आहे. जिओच्या लॉन्चनंतर इतर टेलिकॉम कंपन्यांही सातत्याने नवनव्या ऑफर्स सादर करू लागल्या. युजर्संना याचा फायदा नक्कीच होत आहे. गेट अप टू २०० पर्सेंट कॅशबॅक ऑफर आता रिलायंस जिओने सादर केली आहे. युजर्संना या ऑफरमध्ये ७९९ रुपयांचा कॅशबॅक मिळेल. तुम्ही या प्लॅनचा फायदा १५ फेब्रुवारीपर्यंत घेऊ शकता.

जिओ युजर्संने या ऑफरमध्ये ३९८ रुपये किंवा त्याहुन अधिकचा रिचार्ज केल्यास त्यांना ७९९ रुपयांचा कॅशबॅक मिळेल. जर जिओ युजर्संने MyJio अॅप किंवा Jio.com ने ३९८ रुपयांचा रिचार्ज केल्यास त्यांना १००% म्हणजेच ४०० रुपयांचे इंस्टेंट कॅशबॅक मिळेल. तुम्हाला यात ५०-५० रुपयांचे ८ व्हॉऊचर्स मिळतील. तुम्ही हे व्हाऊचर ३०० रुपयांपेक्षा अधिकचे रिचार्ज करण्यासाठी वापरू शकता. त्याचबरोबर ९१ रुपयांहुन अधिकचा रिजार्ज एड-ऑन करण्यासाठी युजर्स या व्हाऊचरचा वापर करु शकतात.

जिओच्या नव्या आणि जुन्या ग्राहकांना रिचार्जवर ३९९ रुपयांचा कॅशबॅक मोबिक्विक मोबाईल वॉलेटवर देखील मिळेल. रिचार्ज करणाऱ्या नवीन युजर्सला पेटीएमवर ५० रुपयांचा कॅशबॅक तर जुन्या युजर्संना २० रूपयांचा कॅशबॅक मिळेल. तर अॅमेझ़ॉन पे वर ५० रुपये कॅशबॅक मिळेल. फोन पे वॉलेटवर युजर्सला ७५ रुपये आणि फ्रिचार्जवर ५० रुपयांचे कॅशबॅक मिळेल.

Leave a Comment