पुन्हा सुरु झाली जिओच्या ४ जी मोबाईलची विक्री


मुंबई : आपल्या ४ जी मोबाईल फोनची विक्री रिलायन्स जिओने सुरु केली असून हा फोन सुरुवातीला बुकींग करुनही काही लोकांना मिळाला होता. हा फोन आता सगळ्यांसाठी उपलब्ध झाला आहे. त्यासाठी तुम्हाला www.jio.com या कंपनी अधिकृत संकेतस्थळावरून हा मोबाईल विकत घेता येईल.

ग्राहकांना जिओचा ४ जी फीचर फोन विकत घेण्यासाठी १५०० रूपये अनामत रक्कम ठेवावी लागणार आहे. १५०० रूपयांची ही अनामत रक्कम तीन वर्षानंतर ग्राहकांना परत मिळणार आहे. त्यामुळे हा फोन तुम्हाला मोफत मिळणार आहे.

जिओचा हा ४जी फोन घेण्यासाठी तुम्हा www.jio.com या संकेतस्थळावर जावे लागेल. संकेतस्थळ सुरु केल्यानंतर आधी तुम्हाला साईटवर जिओचा ४ जी फीचर फोन दिसेल. त्यानंतर नाऊ ऑर्डर या ऑप्शनवर क्लिक करा. क्लिक केल्यावर तुमचा मोबाईल नंबर टाकून सबमिटवर क्लिक करा. मोबाईल नंबर सबमिट केल्यानंतर डिटेल्स मागितले जाईल. त्या डिटेल्समध्ये तुम्हाला पोस्टल कोड टाकायचा आहे. जर दुसऱ्या नावांनी मोबाईल घ्यायचे असतील तर अॅड न्यू या ऑप्शनवर क्लिक करा. दुसरा मोबाईल नंबर आणि पोस्टल कोड टाकू शकता. त्यानंतर प्रोसीड या ऑप्शनवर क्लिक करा.

प्रोसीड केल्यानंतर मोबाईलसाठी द्यावी लागणारे १५०० रूपये भरण्यासाठी तुम्हाला सांगितले जाईल. पे या ऑप्शनवर क्लिक करा आणि पैसे भरा. पेमेंट प्रक्रिया पूर्ण झाल्यावर तुमच्या मोबाईलवर तुम्हाला कन्फर्मेशन मेसेज येईल. त्यानंतर काही दिवसात जिओचा ४जी फीचर फोन आपल्या हातात पडेल.

Leave a Comment