१० रुपयाची नाणी वैध आहेत – रिझर्व बँक


मुंबई : काही दिवसांपूर्वीच रिझर्व बँकेने १० रुपयांची सर्व नाणी वैध असल्याचे स्पष्ट केले असले तरी देखील अद्यापही अनेक जण १० रुपयांची नाणी स्वीकारत नसल्याचे आरबीआयच्या निदर्शनास आल्यामुळे आरबीआयने आता यासंबंधी नागरिकांना थेट मोबाईलवर मेसेज पाठवणे सुरु केले आहे. आरबीआयने रुपयाचे चिन्ह असलेले आणि नसलेले अशी दोन्ही पद्धतीची १० रुपयाची नाणी वैध असल्याचे पुन्हा एकदा स्पष्ट केले आहे.

रुपयाचे चिन्ह असलेले आणि नसलेले अशी दोन्ही प्रकारची दहा रुपयांची नाणी वैध असल्यामुळे कोणतीही काळजी न करता ही नाणी स्वीकारा. तसेच यासंबंधी तुम्हाला अधिक माहिती जाणून घ्यायची असल्यास आरबीआयच्या १४४४० या क्रमांकावर मिस कॉल द्या, असे आरबीआयने पाठवलेल्या मेसेजमध्ये म्हटले आहे. दरम्यान, आरबीआयने काही दिवसांपूर्वीच यासंबंधी एक निवेदनही जारी केले होते. १० रुपयांची सर्व नाणी वैध असून स्वीकारण्या योग्य आहेत. त्यामुळे या नाणांच्या माध्यमातून व्यवहार होऊ शकतो, असे त्यावेळी स्पष्ट करण्यात आले होते.

Leave a Comment