जगातील या आहेत विस्मयकारक जागा


आपण दुसऱ्या जगांबाबत चित्रपटांपासून ते किस्से आणि कथांमध्ये ऐकत आलेलो आहोत. पण आपल्या जगातही कल्पनांच्या पलिककडे असलेल्या अशा काही जागा आहेत, ज्यांना दुसऱ्या जगात जाण्याचा मार्ग म्हटले जाते. पण याचे काही पुरावे मिळालेले अद्याप नाही, पण तरीही त्याचे अस्तित्व मानले असल्यामुळे त्या दारांची पुजा केली जाते.

सूर्यदेवाचा दरवाजा (बोलिविया) – एक असा गेट बोलिवियामध्ये आहे, सूर्यदेवाचा दरवाजा म्हणून ओळखले जाते. यासमोर दरवर्षी लोक येऊन पुजा करतात. याठिकाणी येणाऱ्या लोकांना अशी अपेक्षा असते की, कधीतरी त्यांच्या पुजेने आनंदी होऊन हे गेट सुरू होईल.

स्टल सेमेट्रीस ( पेनसिल्व्हेनिया) – स्टल सेमेट्री पेनिसिल्व्हेनियामध्ये असून नरकाचे द्वार म्हणून त्याची ख्याती आहे. अशी मान्यता आहे की, हे हे गेट उघडले की, भूत प्रेते यातून बाहेर यायचे आणि ते लोकांना त्रास द्यायचे. अनेक कथा याबाबत सांगितल्या जातात. आजही अशीच एक अख्यायिका याबाबत आहे कि येथे हडळी येऊन पुजा करतात. भुतांनी हे दार उघडून पुन्हा पृथ्वीवर यावे यासाठी त्या पुजा करतात असे म्हटले जाते.

सुमेरियन गेट (Sumerian Gate) – इराकचे लोक आणि त्यांच्या अख्यायिकांशी संबंधित हे गेट आहे. त्याचे कारण म्हणजे ते असे मानतात की, अशा शक्ती त्यांच्या पूर्वजांकडे होत्या की, इतर जगांमध्ये ते ये-जा करू शकतात. तसा उल्लेख त्यांच्या शिलालेखांवरही आहे. त्यांचे पूर्वज ज्या दारातून दुसऱ्या जगात जायचे ते दार अजूनही उपलब्ध असल्याचे लोक मानतात. पण आता ते समुद्रात खोलवर हरवले आहे, अनेकांना प्रयत्न करूनही ते शोधता आलेले नाही.

होया बाचो फॉरेस्ट (Hoia Baciu Forest) रोमानिया – रात्रीच्या वेळी अनेक वस्तू रोमानियामधील होया बाचो फॉरेस्टमध्ये चमकत असतात. येथील लोकांच्या मते, येथून अनेकदा लोकही गायब होतात. एका अख्यायिकेनुसार या जंगलातून एकदा एक मुलगी गायब झाली होती. ती ५ वर्षे कुणालाही दिसली नाही. जेव्हा ती ५ वर्षांनी लोकांना दिसली तेव्हा सर्वांना धक्का बसला. कारण तिचे वय एका दिवसानेही वाढलेले नव्हते. एवढेच नाही, तर ती मुलगी आपण हरवलोच नव्हतो असे म्हणत होती. या जंगलाशी संबंधित अशा अनेक गूढ कथा आहे.

होउस्का कास्टल (Houska Castle) चेक रिपब्लिक – एक असा खड्डा याठिकाणी आहे, ज्याची खोली अद्याप मोजता आलेली नाही. असे म्हटले जाते की, हा खड्डा एवढा खोल आहे की तो थेट नरकापर्यंत जातो. याबाबत अशी एक अख्यायिका सांगितली जाते की, १३व्या शतकात एका कैद्यासमोर अशी अट ठेवण्यात आली की, त्याची शिक्षा रद्द केली जाईल, पण त्यासाठी त्याला खड्डा किती खोल आहे ते पाहून यावे लागेल. दोरीला बांधून त्याला खड्ड्यात उतरवण्यात आले. पण काही सेकंदातच त्याच्या ओरडण्याचा आवाज सुरू झाला. त्याला बाहेर काढले तर तो म्हातारा झालेला होता. खाली जाताच त्याचे वय ३० वर्षांनी वाढले असे तो म्हणाला.

Leave a Comment