चंद्रग्रहणाच्या वेळी झाला होता मार्क झुकरबर्गचा जन्म


काल संपूर्ण जगाने चंद्राचे अनोख रुप पाहिले. जवळपास १५० वर्षानंतर चंद्राचे हे रूप दिसले. चंद्रग्रहण ही खगोलशास्त्रातील घटना आहे. पण चंद्रग्रहणावरुन शुभ- अशुभ, चांगल – वाईट अशा चर्चा देखील होत होत्या. यावर काही लोकांनी देखील विश्वास ठेवला आहे. देशाची राजधानी दिल्लीत हे चंद्रग्रहण संध्याकाळी ५.५८ वाजता दिसले.

कोणत्याही शुभ गोष्टी चंद्रग्रहणाच्या दिवशी करू नयेत. तसेच अनेकजण सांगतात की, गर्भवती महिलांनी या काळात अन्न खावू नये. तसेच असे देखील म्हटले जाते की, चंद्रग्रहण असेल तेव्हा जेवू नये, पाणी पिऊ नये तसेच प्रवास देखील टाळावा. त्याचबरोबर ग्रहणात जन्मलेले बाळ हे अशुभ मानले जाते. पण फेसबुक सारख्या क्रांतिकारी घटना जगात घडली आणि सोशल मीडिया नावाचे नवे माध्यम निर्माण झाले. फेसबुकचा संस्थापक मार्क झुकरबर्ग हा ग्रहण काळात जन्मला आहे. आता ही तुमचा विश्वास आहे का की, ग्रहणात जन्माला आलेले बाळ हे अशुभ आहे.

जन्म ६ डिसेंबर १९२३ला सर्बियाच्या सूर्यग्रहणाच्या अगोदर यूगोस्लोविकियाचा राजा पीटर याचा झाला. तिथेच इटलीचा राजा विक्टर इम्यूनलचा जन्म १४ मार्च १८२० रोजी सूर्य ग्रहणात झाला. मात्र यापेक्षा अधिक जवळचे उदाहरण म्हणजे फेसबुकचा सीईओ मार्क इलियट झुकरबर्ग याचा जन्म देखील चंद्रग्रहणात झाला आहे. १४ मे १९८४ रोजी मार्क झुकरबर्ग याचा जन्म झाला. या दिवशी त्यावेळी चंद्रग्रहण होते.

Leave a Comment