नवी दिल्ली : नोकदारांना अर्थमंत्री अरूण जेटली यांच्या अर्थसंकल्पातून आयकरामधून मोठा दिलासा मिळणार अशी शक्यता होती. पण सरकारने कोणताही बदल टॅक्स स्लॅबमध्ये न केल्यामुळे नोकरदरांची निराशा झाली आहे. २.१ टक्क्यांनी करदात्यांची संख्या वाढली आहे. तरीही टॅक्सची चोरी होत आहे. अशात जेटलींनी कॉर्पोरेटच्या टॅक्समध्ये मोठी सूट दिली आहे.
अर्थसंकल्प २०१८ : नोकरदारांची घोर निराशा
अर्थसंकल्पात कार्पोरेट कंपन्याना मोठा दिलासा देण्यात आला असून २५० कोटींच्या टर्नओव्हरवर २५ टक्के टॅक्स लागणार आहे. नोकरदारांना वैद्यकीय परताव्यासाठी अतिरीक्त ४० हजारांची सवलत मिळणार आहे. याव्यतिरिक्त टॅक्स स्लॅबमध्ये कोणताही बदल करण्यात आलेला नाही.