आयडीयाही देणार मोफत फिचर फोन


काही महिन्यांपूर्वी आपला फिचरफोन जवळपास मोफत देऊन रिलायन्स जिओने मोबाईल क्षेत्रात धुमाकूळ घातला होता. नागरिकांनी या फोनसाठी मोठ्या प्रमाणात नोंदणी केल्यामुळे कंपनीला नोंदणी बंद करावी लागली होती. आता आयडीयाही या मोबाईलला टक्कर देण्यासाठी आपला नवीन फिचर फोन लाँच करणार आहे. कार्बन या भारतीय कंपनीशी कंपनीने यासाठी करार केला आहे. हा ९९९ रुपयांचा फोन खरेदी केल्यावर ग्राहकांना १ हजार रुपयांची कॅशबॅक मिळणार आहे.

त्याचबरोबर स्मार्टफोनच्या खरेदीवरही कॅशबॅक ऑफर देण्यात येणार आहे. २ हजार रुपये इतकी ही किंमत असेल. karbonn K310N, K24 Plus आणि K9 हे फीचरफोन याअंतर्गत आयडिया विकत घेता येणार आहेत. ग्राहकांना कॅशबॅक ऑफर घेण्यासाठी आयडियाचे पहिले १८ महिने २७०० रुपयांचे रिचार्ज करावे लागणार आहे. ग्राहकांना पहिेले १८ महिने झाल्यावर ५०० रुपयांचा टॉकटाइम देण्यात येणार आहे.

१५०० रुपयांची कॅशबॅक ऑफर Karbonn A41 Power आणि A9 indian वर देण्यात आली आहे. २,९९९ आणि ३,९९९ रुपये या दोन्ही फोनची किंमत आहे. कॅशबॅकमधील ५०० रुपये १८ महिने पूर्ण झाल्यावर मिळतील तर उर्वरित १००० रुपये ३६ महिने पूर्ण झाल्यावर मिळतील असे सांगण्यात आले आहे.

Leave a Comment