बिटकॉईन सारखे चलन भारतात चालणार नाही – अरुण जेटली


नवी दिल्ली : भारतात बिटकॉईन सारखे चलन चालणार नाही आणि त्याचबरोबर भारतात बिटकॉईन संपूर्णपणे बेकायदा असून काळा पैसा साठवण्यासाठी क्रिप्टोकरन्सी वापरली जाते, अशा चलन व्यापारावर निर्बंध आणण्यासाठी सरकार प्रयत्नशील असल्याची माहिती अर्थमंत्री अरुण जेटली यांनी दिली.

जगभरात सर्वात महागडे चलन म्हणून बिटकॉईन हे चलन ओळखले जाते. बिटकॉइन हे चलन ऑनलाइन गेमिंग क्विझ पूर्ण केल्यानंतर मिळते. वित्तीय व्यवहारांसाठी बिटकॉईन हे सर्वात जलद आणि कार्यक्षम चलन मानले जाते. दरम्यान जगभरातील कम्प्यूटर्समध्ये व्हायरस पाठवूनही खंडणी मागण्याचे काम बिटकॉइन मार्फत केले जात आहे. त्यामुळे अनेकांना याचा धोका पत्करावा लागला आहे.

बिटकॉईनचा काळा पैसा, हवाला घोटाळा, ड्रग्सची खरेदी, कर चुकवणे आणि दहशतवादी कारवायांमध्ये अतिवापर झाल्याने बिटकॉईन चलन चर्चेचा विषय झाला आहे.

Leave a Comment